Salary Hike : खूशखबर! यंदा होणार दणदणीत पगारवाढ; नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी

Salary Hike : फेब्रुवारी - मार्च महिन्यामध्ये सर्वच कंपन्यांमध्ये पगारवाढीचे वारे वाहू लागतात. आपला पगार नेमका किती वाढणार याचीच धाकधूक कर्मचारी वर्गाला लागलेली असते.   

Updated: Jan 18, 2023, 10:01 AM IST
Salary Hike : खूशखबर! यंदा होणार दणदणीत पगारवाढ; नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी  title=
salary hike Indian Companies will give good appraisal and Increase payment of employees this year latest Marathi news

Salary Hike : काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या (Central Government jobs) विविध विभागांमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ (Salary hike news) होणार, त्यांना सातव्या वेतन आयोगाचा (7th pay commission) फायदा होणार असं वृत्त समोर आलं. त्यातच (Private sector news) खासगी नोकरी करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र निराशा पाहायला मिळाली. सरकारी नोकरदार वर्गाची सातत्यानं होणारी पगारवाढ पाहता, आपल्या हातावर तुटपूंजी रक्कम दिली जाते हाच विचार अनेकांच्या मनात आला. पण, यंदाचं वर्ष मात्र यासाठी अपवाद ठरू शकतं. 

यंदाची पगारवाढ दणदणीत... 

2022 या वर्षाच्या शेवटी अनेक बड्या कंपन्यांनी मोठ्या संख्येनं कर्मचारी कपात केली. परिणामी नव्या आर्थिक वर्षासाठी (Financial year 2023-24) होणारी पगारवाढ समाधानकारक नसेल असाच अंदाज अनेकांनी बांधला. पण, आता त्याला शह देणारी बातमी समोर आली आहे. एका सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या वृत्तानुसार यंदाच्या वर्षी अनेक भारतीय कंपन्या सरासरी किमान 9.8 टक्के इतरी पगारवाढ लागू करू शकतात. 

हेसुद्धा वाचा : 7th pay commission : अखेर तो दिवस आलाच! सातव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी

 

8 लाखांहून अधिक कर्मचारी संख्या असणाऱ्या 818 कंपन्यांचा या सर्व्हेक्षणात सहभाग होता. कोरोना काळात अनेक कंपन्यांनी फक्त 6.8 च्या सरासरीत पगारवाढ केली होती. पण, (Corona Wave) कोरोनाची लाट ओसरल्यानंतर अनेक कपन्यांमध्ये वेतनश्रेणीत सकारात्मक बदल झाले. एकिककडडे देशाच्या अर्थव्यवस्थेला (Economy) या कंपन्यांकडून हातभार लावला जात असतानाच दुसरीकडे त्यांनी समाधानकारक पगार देऊन कर्मचाऱ्यांनाही दिलासा दिला. या साऱ्यामुळं यंदाच्या वर्षीही पगारवाढ 9.8 टक्क्यांनी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मोठ्या हुद्द्यांवर काम करणाऱ्यांचा पगार अधिक प्रमाणात वाढेल असंही सांगण्यात आलं. 

कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या घेणार मोठे निर्णय 

कामाच्या प्रची तत्पर असणाऱ्या आणि सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपन्यांकडून चांगली पगारवाढ देत त्यांना अप्रत्यक्षरित्या नोकरीमध्ये बदल करण्याच्या विचारापासून परावृत्त करण्यात येईल. अनेक कंपन्या या याच धर्तीवर यंदाच्या Appraisal Process मध्ये निर्णय घेऊ शकतात. त्यामुळं त्यांची पगारवाढ 15 ते 30 टक्के इतकीही होऊ शकते. त्यामुळं तुम्हीही पगारवाढीच्या प्रतीक्षेत असाल तर, यंदाचं वर्ष तुम्हाला फळणार असंच चित्र स्पष्ट दिसत आहे.