मुंबई : देशातील सर्वात मोठ्या बँकेने एका व्हिडिओद्वारे सामान्य नागरिकांसाठी सतर्कता जारी केली आहे. (sbi alert massage to his customer on fraud calls) या व्हिडिओद्वारे बँकेने ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ऑनलाइन फसवणूकीबाबत हा इशारा देण्यात आला आहे. हा व्हिडिओ केवायसी पडताळणीसंदर्भात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर बँकेने ट्विट केले की 'केवायसी पडताळणीची विनंती करणार्या फ्राड कॉल ( fraud calls) किंवा मेसेजपासून स्वत: चा बचाव करा. फसवणूक करणारा आपला वैयक्तिक तपशील मिळविण्यासाठी बँक तसेच कंपनी प्रतिनिधी असल्याचे भासवून फोन कॉल करतो किंवा मजकूर संदेश पाठवितो. अशा घटना नोंदवा: cybercrime.gov.in
अनेक हॅकर्स ग्राहकांना फोन करतात आणि आपली माहिती घेऊन बॅंक खाते पूर्ण खाली करतात. अशा अनेक तक्रारीही SBI बँकेकडे आल्या आहेत. त्यानंतर ही बाब बँकेला समजली. KYC व्हेरिफायच्या नावे फोन आला तर तुम्ही सावधान व्हा, असे बँकेने म्हटले आहे.
कोणाबरोबरही ओटीपी (OTP) शेअर करू नका.
रिमोट अॅक्सेस एप्लीकेशनपासून सावधान राहा
आधारची प्रत कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर शेअर करू नका.
आपली नवीनतम संपर्क माहिती आपल्या बँक खात्यात अद्यतनित ठेवा.
आपला पासवर्ड वेळोवेळी बदला.
आपला मोबाइल नंबर आणि गोपनीय डेटा कोणाबरोबरही शेअर किंवा सांगू करू नका.
कृपया कोणत्याही कोणतीही लिंक क्लिक करण्यापूर्वी योग्यरित्या खात्री करा. उगाच लिंक आली म्हणून उत्सुकतेपोटी ओपन करु नका.
KYC सत्यापन का अनुरोध करने वाले कपटपूर्ण कॉल या संदेशों से खुद को सुरक्षित रखें। जालसाज आपके व्यक्तिगत विवरण हासिल करने के लिए बैंक/ कंपनी प्रतिनिधि होने का नाटक करते हुए एक फोन कॉल करता है या टेक्स्ट संदेश भेजता है। ऐसे मामलों की रिपोर्ट करें: https://t.co/d3aWRrx4G8 #KYCFrauds pic.twitter.com/7rwkBlgMWh
— State Bank of India (@TheOfficialSBI) January 13, 2021
सध्या अनेक लोक SBIच्या नावाने ग्राहकांना फोन करून वैयक्तिक माहिती विचारत आहेत. त्यामुळे तुम्हालाही असा कोणता फोन आला तर सावध राहा आणि तपासणी केल्याशिवाय आपली खासगी माहिती सांगू नका, असे बँकेकडून आवाहन करण्यात आले आहे. नाहीतर तुम्हाला याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.