शाळेची घंटा लवकरच वाजणार, ICMR ने दिले संकेत

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा लवकरच सुरु होणार

Updated: Jul 20, 2021, 06:14 PM IST
शाळेची घंटा लवकरच वाजणार, ICMR ने दिले संकेत title=

नवी दिल्ली : कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आता लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. मुलांना कोरोनाचा धोका कमी असल्यानं शाळा लवकरच सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्राथमिक शाळा सुरू झाल्यानंतर माध्यमिक वर्ग ही सुरु होतील. ICMR ने शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहे.

मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. डॉ. भार्गव यांना शाळा सुरु करण्यासंदर्भात जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी म्हटलं की, सुरुवातीला  प्रायमरी स्कूल (Primary School) सुरु होतील. कारण लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचा धोका कमी आहे. 

यूरोपच्या अनेक देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये ही शाळा सुरु ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरु केल्या जातील. 

डॉ. भार्गव यांनी म्हटलं की, छोटे मुलांमध्ये व्हायरसचा धोका कमी आहे. लहान मुलांच्या फुफ्फुसांमध्ये ACE रिसेप्टर्स कमी असतात. जेथे व्हायरस अटॅक करतो. मुलांमध्ये इन्फेक्शन (Infection)चा धोका कमी असतो. 6 ते 9 वर्षाच्या मुलांमध्ये 57.2% अँटीबॉडीज आढळल्या आहेत.