Gautam Adani: शॉर्ट सेलिंग प्रकरणात SEBI चा मोठा निर्णय, खऱ्या-खोट्यावरून पडदा उठणार?

नुकत्याच आलेल्या आएएनसच्या वृत्तानुसार, अदानी समुहाच्या शेअर रेट्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. ही घसरण शॉर्ट सेलिंगमुळे आल्याचे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभुमीवर आता सेबीकडून चौकशी करण्यात येणार आहे.

Updated: Jan 30, 2023, 10:19 AM IST
Gautam Adani: शॉर्ट सेलिंग प्रकरणात SEBI चा मोठा निर्णय, खऱ्या-खोट्यावरून पडदा उठणार? title=

Hindenberg vs Adani: तुम्ही शेअर बाजारात जाता. चांगल्या कंपनीचा स्टॉकही (Share Market) पाहता. त्याचबरोबर त्या शेअरची बाजारात केवढी किंमत आहे याचा सखोल अभ्यास करून तुम्हाला तो शेअर विकत घेण्याचा सल्ला गुंतवणूकदार (Investors) देतात. तर दुसरीकडे तुम्हाला जर का एखाद्या कंपनीचा शेअर विकायचा असेल तर तो तुमच्याकडे असणं स्वाभाविकच आहे. मग तुम्ही तुमची स्ट्रेटेजी (Market Strategy) ठरवल्यानंतर त्या शेअरची बाजारातील किंमत वाढली की तो शेअर विकू शकता. पण शॉर्ट सेलिंगमध्ये मात्र तुम्ही याच्या अगदी विरूद्ध काम करू शकता. (Sebi may take inquiry against short selling practice in indian markets says media reports)

नुकत्याच आलेल्या आएएनसच्या वृत्तानुसार, अदानी समुहाच्या शेअर रेट्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. ही घसरण शॉर्ट सेलिंगमुळे आल्याचे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभुमीवर आता सेबीकडून चौकशी करण्यात येणार आहे. 

यासाठी हिंडनबर्ग (Hindenberg on Adani Group) या संस्थेकडून अदानी समूहावर आरोप करण्यात आले आहे. मात्र अदानी समूहाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. त्यांनी तथ्यहीन असल्याचेही कंपनीकडून सांगितले आहेत तसेच त्यांनी कोणतीही माहिती लपवली नसल्याचेही सांगितले आहे. 

हिंडनबर्गकडून शॉर्ट सेलिंग?

शॉर्ट सेलिंगमुळे शेअर मार्केटमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जोखीम (Risk in Market) निर्माण केली जाते. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये या शॉर्ट सेलिंगचीच चर्चा आहे. हिंडनबर्ग ही एक रिचर्स फर्म आहे. ज्यांनी अदानी समूहातील कंपनीच्या विरोधात शॉर्ट सेलिंग करत असल्याचे मान्य केले होते. अदानी समुहाच्या शेअर रेटमध्ये खूप मोठी घसरण सुरू असल्याने त्याचा फायदा घेत हिंडनबर्गकडून सांगण्यात आले होते. हिंडनबर्गनं आपल्या रिचर्स अहवालात अदानी समुहावर प्रश्न चिन्ह उभे केले होते. अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर हे 85 टक्क्यांहून अधिक ओव्हरव्हॅल्यूड (Overvalued) असल्याचे या कंपनीकडून म्हटले आहे. हिंडनबर्गनं असे आरोप केले आहेत की अदानी समूहाकडून फसवणूक सूरू आहे आणि त्यांच्या शेअर्सचे दर हे अवाजवी प्रमाणात वाढवले आहे. 

काय आहे शॉर्ट सेलिंग? 

शॉर्ट सेलिंगमध्ये (Short Selling) गुंतवणूकदार त्यांच्याकडे नसलेला शेअर आधी विकू शकतात. त्यानंतर त्या शेअरची किंमत घसरल्यानंतर तो शेअर खरेदी करू शकतात. असा व्यवहारातील फरक हा त्यांचा नफा ठरतो. जर एका शेअरची किंमत 60 रूपये असेल आणि जर तो एका गुंतवणूकदारानं खरेदी केला तर 90 रूपयांची किंमत गाठल्यानंतर हा शेअर विकला तर त्या गुंतवणूकदाराला 30 रूपयांचा फायदा झाला. जर तुम्ही शॉर्ट सेलिंग करणार असाल तर तुम्ही 60 रूपयांचा शेअर विकत न घेता तो तुम्ही थेट 90 रूपयांना विकता. जर शेअरमध्ये घसरण झाली की तो 30 रूपयांवर खरेदी केला तर त्याला त्या शेअरचा 60 रूपयांचा फायदा झालाय असं आपण म्हणून शकतो.