EPFO Pension: भविष्यात आपल्याला अनेक आधारांची गरज लागते आणि त्यातला महत्त्वपुर्ण आधार म्हणजे आर्थिक. आर्थिक आधाराशिवाय आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे आपण नेहमीच असा विचार करतो की आपल्या कुटुंबियांसाठी आपण त्यांचे भविष्य जास्त सुरक्षित कसे करू शकू. त्यातून आपल्या मुलांसाठीही आपण तसाच विचार करतो. केवळ विचारच नाही तर त्यापद्धतीनं आपण सेव्हिंग्स आणि एनव्हेसमेंट (Investments for your family) करायचाही कसोशीनं प्रयत्न करतो. त्यामुळे पैसे गुंतवण्यासाठी आपल्याला अनेक पर्याय हवे असतात. त्यातूनही आपल्याला या सगळ्या पर्यांयामध्ये अधिक सुरक्षितताही हवी असते. त्यातला सर्वात सोप्पा पर्याय म्हणजे भविष्य निर्वाह निधी (EPFO). खातेधारकांना या खात्यावर चांगले फायदे मिळत असतात आणि यातलाच मोठा फायदा आहे तो म्हणजे पेन्शनचा. तेव्हा जाणून घेऊया कर्मचाऱ्यांसह तुमच्या कुटुंबियांनाही याचा कसा फायदा होऊ शकतो. (secure your future with your epfo pension scheme not only for you but your family also)
ईपीएफ (EPF) पेन्शन स्किमचा फायदा आपल्या सगळ्यांना जरूरीचा असतो. परंतु या योजनेचे अनेक नियमही असतात जे अनेकदा ग्राहकांना माहिती नसतात. एकदा कर्मचारी म्हणून तुम्ही या योजनेचे सदस्यत्व घेता तेव्हा तुम्ही तुमचं आणि तुमच्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित करू शकता आणि त्यातून निवृत्तीनंतरही तुम्हाला EPS-95 अंतर्गत निवृत्ती वेतन दिले जाते. हे वेतन फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबियांनाही मिळू शकते. तेव्हा जाणून घेऊया तुम्ही या योजनेचा फायदा (Benefits of EPFO) कसा करू घेऊन शकतो. यासाठी तुम्हाला काही नियमही समजून घ्यावे लागते. जर तुमचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबियाना पेन्शन मिळू शकते. यामध्ये काही असे नियम आहेत ज्यांचे पालन तुम्हाला करावे लागणार आहे. ज्या पालकांनी त्यांचं अपत्य गमावले आहे त्यांना ईपीएफओ पुर्णपणे मदत करते पण त्यात काही अटी आणि नियम (How to login on EPFO) आहेत.