सीमा हैदरचे ATS चौकशीत धक्कादायक खुलासे, म्हणाली 'सचिन हा पहिला नाही, त्याच्याआधी...'

Seema Haider Sachin: उत्तर प्रदेश एटीएसचं (ATS) पथक सध्या सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिनची (Sachin) चौकशी करत आहे. यावेळी सीमाने अनेक खुलासे केले आहेत. सचिन हा सीमाच्या संपर्कात येणारा पहिला तरुण नव्हता. तिने याआधीही PUBG च्या माध्यमातून दिल्ली-एनसीआरमधील (Delhi NCR) अनेक तरुणांशी संपर्क साधला होता. सीमा ज्याप्रकारे अजिबात न घाबरता उत्तर देत आहे, ते पाहता एटीएसला थोडं आश्चर्य वाटत आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 18, 2023, 01:05 PM IST
सीमा हैदरचे ATS चौकशीत धक्कादायक खुलासे, म्हणाली 'सचिन हा पहिला नाही, त्याच्याआधी...' title=

Seema Haider Sachin ATS : उत्तर प्रदेश एटीएसचं (ATS) पथक सध्या सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिनची (Sachin) चौकशी करत आहे. सोमवारीही सीमा, सचिन आणि सचिनच्या वडिलांची 8 तास चौकशी केली होती. चौकशीदरम्यान, अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन हा पहिला भारतीय तरुण नाही, ज्याच्याशी सीमाने संपर्क साधला होता. 

सचिन हा सीमाच्या संपर्कात येणारा पहिला तरुण नव्हता. तिने याआधीही PUBG च्या माध्यमातून दिल्ली-एनसीआरमधील (Delhi NCR) अनेक तरुणांशी संपर्क साधला होता. सीमा ज्याप्रकारे अजिबात न घाबरता उत्तर देत आहे, ते पाहता एटीएसला थोडं आश्चर्य वाटत आहे. 

सध्या युपी एटीएस सीमा आणि सचिन यांची स्वतंत्र चौकशी करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एटीएसने सोमवारी सीमा हैदरला इंग्रजीतील काही ओळी वाचण्यास सांगितलं होतं. सीमाने त्या फक्त वाचल्या नाहीत, तर त्या वाचण्याची पद्धतही चांगली होती. सीमा अगदी आत्मविश्वासाने उत्तर देत असल्याने एटीएस पूर्ण काळजी घेत आहे. सीमाला कोणी मार्गदर्शन तर करत नाहीये ना अशी एटीएसला शंका असून, त्यादृष्टीने तपासही केला जात आहे. सीमाच्या सासरचे आणि माहेरचे लोक काय करतात, कुठे आहेत? यासंबंधीही तपास केला जात आहे. 

सीमाचे काका आणि भाऊ पाकिस्तानी लष्करात असल्याने शंका उपस्थित होत आहे. तसंच सीमा विना व्हिसा भारतात आल्यानेही चौकशी केली जात आहे. एटीसएसने सोमवारी सीमा हैदरचा पासपोर्ट, आधार कार्ड आणि तिच्या मुलांशी संबंधित कागदपत्रांची छाननी केली. यावेळी ग्रेटर नोएडा रबूपुरा ठाण्याच्या प्रभारींना बोलावण्यात आलं होतं. त्यांच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांचा सहभाग त्यांना आपल्या तपासात केला आहे. 

ISI आणि पाकिस्तानी लष्कराशी संबंधांचा तपास

सीमा हैदरच्या ISI आणि पाकिस्तानी लष्कराशी असणाऱ्या संबंधांचाही तपास केला जात आहे. याशिवाय  सीमा हैदरने नोएडा पोलिसांना दिलेला जबाब आणि एटीएसच्या चौकशीत दिलेल्या उत्तरांची पडताळणी केली जाणार आहे. 

एटीएस सीमा हैदरचा पहिला पती गुलाम हैदरशी फोनवरुन संवाद साधणार आहे. यानंतर सीमाने दिलेली उत्तरं आणि गुलामने दिलेली माहिती एकत्र करुन पाहिली जाणार आहे. तपासाअंती एटीएस रिपोर्ट तयार करणार आहे. हा रिपोर्ट लखनऊच्या मुख्य कार्यालयात पाठवला जाईल. यानंतर तो गृहमंत्रालयायकडे सादर होईल. त्यामुळे सर्वांच्या नजरा एटीएसच्या तपासाकडे लागल्या आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x