सेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक; पहिल्यांदाच 56 हजारांवर घेतली झेप!

सेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक; गुंतवणुकदारांना मोठा नफा

Updated: Aug 18, 2021, 12:40 PM IST
सेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक; पहिल्यांदाच 56 हजारांवर घेतली झेप! title=

मुंबई : देशांतर्गत शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत आहे. बुधवारी शेअर बाजाराने अष्टपैलू खरेदीसह पुन्हा एकदा नवा इतिहास रचला. सेंसेक्सने पहील्यांदा 56 हजारांचा टप्पा पार केला आहे. ग्लोबल मार्केटमधून मिळालेल्या संकेतानुसार एचडीएफसी बँक (HDFC Bank), इंफोसिस, रिलायसं इंडस्ट्रीज (RIL) च्या सेंसेक्सच्या आकड्यांमध्ये 281 अंकांनी वाढ झाली आहे. बाजारात तेजी असल्यामुळे गुंतवणूकदारांना 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त फायदा झाला.

निफ्टीत देखील कमालीची वाढ नोंदवण्यात आली आहे. निफ्टी जवळपास 16 हजार 700वर पोहोचला आहे.  सध्या निफ्टी 70 अंकांच्या उच्चांकासह 16 हजार 684 वर ट्रेड करत आहे. एचडीएफसी बँक सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 2 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, पॉवरग्रिड, एल अँड टी, बजाज फिनसर्व आणि एचडीएफसी कंपनाचे शेअर्स वाढले आहेत.

 दुसरीकडे, इंडसइंड बँक, कोटक बँक, बजाज ऑटो आणि इन्फोसिसचे शेअर घसरले आहेत. त्यामुळे या कंपन्यांमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आह. त्यांच्यासाठी ही धक्का देणारी बाब आहे. बुधवारी गुंतवणूकदारांनी बाजारात विक्रमी ट्रेडिंगच्या एकाच तासात 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमावला आहे.