सीरमच्या अदार पूनावाला यांना केंद्र सरकारकडून Y श्रेणी संरक्षण

अदार पुनावाला यांना केंद्र सरकारचं संरक्षण

Updated: Apr 28, 2021, 09:23 PM IST
सीरमच्या अदार पूनावाला यांना केंद्र सरकारकडून Y श्रेणी संरक्षण title=

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदार पूनावाला यांना वाय श्रेणी (Y Category) संरक्षण दिलं आहे. गृह मंत्रालयाकडून या संदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. अदार पूनावाला यांना सीआरपीएफ संरक्षण देण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सीरम इंस्टिट्यूट सध्या भारतात कोरोनावरील वॅक्सीन पुरवत आहे. इतकंच नाही तर संपूर्ण जगात सीरमकडून वॅक्सीन पूरवली जात आहे. 

सायरस पूनावाला यांचा मुलगा अदार यांनी परदेशात शिक्षण पूर्ण केलं. भारतात आल्यानंतर त्यांनी वडिलांसोबत काम करायला सुरुवात केली. सीरम इंस्‍टीट्यूट ऑफ इंडियाच्या यशात अदार पूनावाला यांची महत्त्वाची भूमिका आहे. आज भारताच्या दिग्‍गज व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. महाराष्‍ट्रातील पुणे या ठिकाणी सीरम इंस्‍टीट्यूट ऑफ इंडियाचा जवळपास 100 एकर मध्ये कॅम्पस पसरला आहे.