खाजगी क्षेत्राद्वारे तयार केलेल्या पहिल्या सॅटेलाईटचं लॉन्चिंग फसलं

भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) गुरुवारी केलेल्या भारताच्या आठव्या नौवहन उपग्रह 'IRNSS-1'चं लॉन्चिंग पूर्णत: फसलंय. उल्लेखनीय म्हणजे, खाजगी क्षेत्राच्या साहाय्यानं तयार करण्यात आलेलं हे पहिलंच सॅटेलाईट होतं. 

Updated: Aug 31, 2017, 09:52 PM IST
खाजगी क्षेत्राद्वारे तयार केलेल्या पहिल्या सॅटेलाईटचं लॉन्चिंग फसलं title=

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) : भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) गुरुवारी केलेल्या भारताच्या आठव्या नौवहन उपग्रह 'IRNSS-1'चं लॉन्चिंग पूर्णत: फसलंय. उल्लेखनीय म्हणजे, खाजगी क्षेत्राच्या साहाय्यानं तयार करण्यात आलेलं हे पहिलंच सॅटेलाईट होतं. 

इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरन कुमार यांनी 'अभियान अयशस्वी ठरलं' अशा शब्दांत या अभियानाविषयी माहिती दिली. साहजिकच या अपयशामुळे इस्रोला जोरदार झटका बसलाय. 

गुरुवारी सायंकाळी ७.०० वाजता भारतीय नौवहन उपग्रह प्रणाली 'NSVIC'द्वारे १४२५ किलोग्रॅम वजणाचा हा उपग्रह लॉन्च केला होता. यासाठी PSLV श्रेणीच्या XAL प्रकारातील रॉकेटच्या साहाय्यानं हा उपग्रह लॉन्च करण्यात आला होता. ४४.४ मीटर लांब आणि ३२१ किलो वजनाच्या चार भागांच्या PSLV-AXL रॉकेटनं श्रीहरिकोटा प्रक्षेपण स्थळाच्या दुसऱ्या लॉन्चपॅडहून उड्डाण घेतलं होतं. हे प्रक्षेपण अयशस्वी ठरण्यामागच्या कारणांचा शोध घेतला जातोय. 

भारतीय उपग्रह प्रणाली 'NSVIC' साध्या शब्दांत भारताची जीपीएस प्रणाली मानलं जातं.