दिल्लीतील मोठ्या घडामोडीकडे लक्ष, गडकरी जाणार शरद पवारांकडे स्नेहभोजनाला?

Sharad Pawar Dinner Diplomacy : राज्यातले सर्वपक्षीय आमदारांना आज संध्याकाळी 6 वाजता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी चहापानाचे आमंत्रण देण्यात आले आहे. तर रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वपक्षीय आमदारांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. 

Updated: Apr 5, 2022, 01:58 PM IST
दिल्लीतील मोठ्या घडामोडीकडे लक्ष, गडकरी जाणार शरद पवारांकडे स्नेहभोजनाला? title=

नवी दिल्ली : Sharad Pawar Dinner Diplomacy : राज्यातले सर्वपक्षीय आमदारांना आज संध्याकाळी 6 वाजता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी चहापानाचे आमंत्रण देण्यात आले आहे. तर रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वपक्षीय आमदारांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. त्याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari) यांनाही निमंत्रण पवार यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. (BJP minister Nitin Gadkari may be meets NCP Chief Sharad Pawar)

शिवसेना खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांच्या घरी भाजप आमदार उपस्थित राहणार का याची उत्सुकता आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे महत्त्वाचे नेते नितीन गडकरी पवार यांच्याकडे स्नेहभोजनाला उपस्थित राहणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 

दरम्यान, भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही भाजप खासदार आणि आमदारांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. सध्या राज्यातले सर्वपक्षीय आमदार एका प्रशिक्षणासाठी नवी दिल्लीत आहेत. मात्र, त्यांच्या प्रशिक्षणाऐवजी स्नेहभोजनाचीच जास्त चर्चा सुरु आहे.