Share Market मध्ये तेजीनंतर पुन्हा घसरण; पाहा कोणते शेअर्स देतायत जोरदार रिटर्न्स

खरेदीचा जोर असल्याने शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. सोमवारच्या सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा शेअर बीएसईवर 20% अपर सर्किटसह 10.57 रुपयांवर पोहोचला. 

Updated: Sep 6, 2022, 10:42 AM IST
Share Market मध्ये तेजीनंतर पुन्हा घसरण; पाहा कोणते शेअर्स देतायत जोरदार रिटर्न्स  title=

Share Market Update : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात (share market) तेजी दिसून आली. खरेदीचा जोर असल्याने शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. सोमवारच्या सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा शेअर बीएसईवर 20% अपर सर्किटसह 10.57 रुपयांवर पोहोचला. (share market update)

दरम्यान सेन्सेक्सने (sensex) आजही पुन्हा एकदा 59, 000 अंकांचा टप्पा ओलांडला. पण आज बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. शेअर बाजाराच्या (share market) सुरवातीला 35 अंकाची वाढ झाली, त्यानंतर काही वेळाने त्यात घसरण होऊन तो 15 अंकावर घसरला. तर निफ्टीमध्येही 11 अंकाची वाढ झाली त्यानंतर काही वेळाने तो 9 अंकावर घसरला. पुन्हा त्यामध्ये वाढ होऊन सेन्सेक्स 35 अंकांच्या तेजीसह 59,224 अंकांवर दिसून आला तर निफ्टीमध्ये 12 अंकांच्या तेजीसह 17,676 वर दिसून आला.

जागतिक मंदीच्या शक्यतेमुळे येत्या ट्रेडिंग (trending) सत्रात बाजार अस्थिर राहू शकेल असा बाजार तज्ज्ञांचा अंदाज असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. त्यामुळे सोमवारी बाजार सावध तेजीत दिसला.

वाचा :  YouTube वर सतत येणाऱ्या Ads कशा बंद कराव्या? पाहा settings

दरम्यान तांत्रिक दृष्टीकोनातून, बाजारात 20 दिवसांच्या SMA जवळ पॉझिटीव्ह कंसोलिडेशन दिसत आहे. आता 17550 च्या आसपास निफ्टीला सपोर्ट दिसत आहे. याच्या वर टिकून राहिल्यास, 17550-17800 कडे जाऊ शकतो. दुसरीकडे, जर ते 17550 च्या खाली घसरले तर ही घसरण 17450 - 17400 पर्यंत जाऊ शकते.