युतीबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून सहकार्य नाही, राहुल शेवाळे यांचा आरोप

खासदार राहुल शेवाळे यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत शिवसेना-भाजप युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला.

Updated: Jul 19, 2022, 06:52 PM IST
युतीबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून सहकार्य नाही, राहुल शेवाळे यांचा आरोप  title=

नवी दिल्ली : खासदार राहुल शेवाळे यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत शिवसेना-भाजप युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जवळपास तासभर युतीबाबत चर्चा झाली, असा गौप्यस्फोट शेवाळे यांनी केला. तसेच युतीसाठी ठाकरे यांनी सहकार्य न केल्याचा आरोपही  शेवाळे यांनी यावेळेस केला. (shiv sena party chief uddhav thackeray and pm narendra modi 1 hour discussion on alliance says mp rahul shewale)

शेवाळे काय म्हणाले? 

ज्यावेळी आमदारांनी ही भूमिका घेतली तेव्हा सर्व खासदारांना बैठकीसाठी बोलावलं होतं. त्या दिवशी सर्व खासदारांनी सांगितलं की आम्ही पक्षासोबतच राहू, तेव्हा आम्ही सांगितलं होतं की दोन अडीच वर्ष आम्हाला खूप त्रास होत आहे, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमची भूमिका मान्य केली. 

त्यावेळी त्यांनी सांगितलं, की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर निश्चितपणे मी ती भूमीका स्विकारेन आणि त्या निर्णयाचं मी स्वागत करेन, त्या बैठकीला संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंतही उपस्थित होते. या सर्वांसमोर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितलं की एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले आणि भाजपने तसा निर्णय घेतला असेल तर त्याचं मी स्वागत करेन त्यामुळे त्या भूमिकेशी आम्हीही सहमत झालो, पण ज्यावेळी दुसरी बैठक झाली त्यावेळीही असं ठरलं की 2024 ची निवडणुकी लढवायची असेल तर युती करणं महत्त्वाचं आहे. पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आम्हाला वांरवार हेच सांगितलं की महाविकास आघाडीसोबत आपण येणारी निवडणूक लढवूया पण आम्ही विरोध दर्शवला. 

प्रत्येक खासदाराने लोकसभा मतदार संघातील अडचणी अरविंद सावंत यांना सांगितल्या, अरविंद सावंत यांनीही ही भूमिका मान्य करुन उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवली. 

पंतप्रधान मोदींबरोबर एक तास युतीबाबत चर्चा

खासदारांच्या उपस्थित उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मलाही युती करायची आहे, मी माझ्या परिने युती करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या गोष्टीचाही उल्लेख केला की ज्यावेळी पंतप्रधान मोदींना भेटायला आहे, त्या भेटीत मोदींकजे या गोष्टीचा उल्लेख केला, पंतप्रधान मोदींबरोबर एक तास युती संदर्भात चर्चा झाली.

जूनमध्ये ही बैठक झाली आणि जुलैमध्ये विधानसभेचं अधिवेशन होतं, त्यात भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींमध्येही नाराजी होती. 

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितलं, मी माझ्यापरीने युतीसाठी प्रयत्न केले, आता तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा, त्यानंतर मी स्वत: चार पाच खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवंद्र फडणवीस यांना भेटलो, पण वारंवार शब्द देऊनही जी कमिटमेंट करायला हवी त्याची पूर्तता न केल्याने भाजपचे पक्षश्रेष्ठीही नाराज होते.