मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे प्रचंड धक्का बसला. त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे मला प्रचंड दु:ख झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. तसेच, त्यांच्या कुटुंबियांना दु:खातून बाहेर पडण्याचे बळ मिळो, अशा शब्दांत राज्यसभा खासदार आणि एस्सेल समूहाचे मार्गदर्शक सुभाष चंद्रा यांनी श्रीदेवी यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Shocked and saddened at the untimely & unfortunate passing away of the legendary actress #Sridevi Ji. My heart reaches out to the bereaved family in this hour of grief. Deepest condolences to my friend Boney Kapoor. Om Shanti!
— Subhash Chandra (@subhashchandra) February 25, 2018
दरम्यान, श्रीदेवी या आपल्या पुतण्याच्या विवाहासाठी दुबईला गेल्या होत्या. हृदयविकाराचा धक्क्यामुळे त्यांचा दुबईतच मृत्यू झाला. शनिवारी रात्री १२च्या दरम्यान ही घटना घडली. त्यांच्या मृत्यूसमयी पती बोनी कपूर आणि त्यांची छोटी बहिण त्यांच्या सोबत होती.
श्रीदेवीच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांच्या आठणीत चाहते त्यांची गाणी, व्हिडिओ, चित्रपट पहात आहेत. ज्या ज्या मार्गाने श्रीदेवी यांच्याबाबत माहिती मिळेल तसतशी माहिती ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वांना एकच प्रश्न सतावत आहे, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना श्रीदेवीने एक्झिट घेतली. अकाली मृत्यूबद्धल प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.