मुलाच्या प्रेमात अडथळा, वडील आणि विवाहित गर्लफ्रेंडचा काढला कायमचा काटा...

Son Killed Father And His Girlfriend : मुलाच्या प्रेमात अडथळा ठरणारे वडील आणि त्यांच्या विवाहित गर्लफ्रेंडवर जीवघेणा हल्ला त्याने केला 

Updated: Oct 23, 2021, 09:33 AM IST
मुलाच्या प्रेमात अडथळा, वडील आणि विवाहित गर्लफ्रेंडचा काढला कायमचा काटा...

म्हैसूर: Son Killed Father And His Girlfriend : मुलाच्या प्रेमात अडथळा ठरणारे वडील आणि त्यांच्या विवाहित गर्लफ्रेंडवर जीवघेणा हल्ला त्याने केला. या हल्ल्यात दोघांचा जीव गेला. मुलाने वडिलांवर चाकूने हल्ला केला. यावेळी वडिलांच्या मैत्रिणीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता मुलाने त्यांच्यावरही हल्ला केला. ते दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. कर्नाटकातील म्हैसूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 

स्वत:च्या मुलाने आपल्या वडिलांची आणि त्यांच्या विवाहित मैत्रिणीची निर्घृण हत्या केली. घटनेचा खुलासा झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. केजी कोप्पल येथील रहिवासी 56 वर्षीय शिवप्रकाश आणि म्हैसूरच्या श्रीनगर भागातील रहिवासी 48 वर्षीय लता अशी मृतांची नावे आहेत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या हल्ल्यात लतादीदींचा मुलगा नागार्जुन हाही गंभीर जखमी झाला आहे. नागार्जुन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलीस आरोपींच्या शोधात

आरोपी सागर घटनेनंतर तेथून फरार आहे. पोलीस पथकाने मृत शिवप्रकाशचा मुलगा सागर याचा शोध सुरू केला आहे. आरोपी सागरवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

घटनेच्या दिवशी काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी घटनेच्यावेळी मृत शिवप्रकाश हा त्याच्या विवाहित मैत्रिणीच्या घरी उपस्थित होता. सागरने तेथे चाकूने वडील शिवप्रकाश यांच्यावर हल्ला केला. लताने सागरला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने लता यांच्यावरही चाकूने वार केले. यानंतर सागरने लतादीदींचा मुलगा नागार्जुनवरही चाकूने वार केले.

पोलीस सूत्रांनी सांगितले की, शिवप्रकाश यांचे लतासोबत अफेअर होते, पण सागरला तिचे वडिलांना भेटणे आवडत नव्हते आणि वडिलांच्या सहज वागण्यावर मुलाचा आक्षेप होता.