ईsss; 'या' आहेत सर्वात घाणेरड्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या; यातून चुकूनही प्रवास करु नका

Indian Railway : तुम्ही आतापर्यंत कधी रेल्वेनं प्रवास केलाय का? बरं केला आहे, तर तुम्हाला या प्रवासाच काही नकारात्मक गोष्टी दिसल्या का? ही बातमी वाचा सर्वकाही लक्षात येईल.   

Updated: Jan 26, 2023, 12:49 PM IST
 ईsss; 'या' आहेत सर्वात घाणेरड्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या; यातून चुकूनही प्रवास करु नका  title=
Shocking Most Dirty Trains in India names will shick you

Most Dirty Trains in India : गेल्या काही वर्षांमध्ये देशात (Indian Railway) रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहेत. महत्वाची शहरं असो किंवा लहानसहान खेडी. प्रत्येक ठिकाणारा, देशातील प्रत्येक कानाकोपऱ्याच्या जोडण्याचं काम या रेल्वेनं केलं आहे. समाजातील प्रत्येक उत्पन्न गटात मोडणाऱ्यांना सुखकर प्रवासाच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या. काळ पुढे आला तसतशी रेल्वेही बदल गेली. 

अगदी राजेशाही थाट ते जनरल बोगी इथपर्यंत सर्वकाही एकाच रेल्वेमध्ये पाहायला मिळालं. पण, रेल्वेची ही चांगली बाजू पाहत असताना त्याच्या वाईट बाजूचाही विचार केला जाणं तितकंच महत्त्वाचं आहे. ही बाजूच तुम्हाला त्रास देऊ शकते. त्यामागचं कारण म्हणजे रेल्वेमध्ये असणारी अस्वच्छता. 

रेल्वे अॅपवर अनेकांनी केल्या तक्रारी... 

(Railway App) रेल्वे अॅपच्या मदतीनं मिळालेल्या माहितीनुसार देशातील सर्वात घाणेरड्या रेल्वे गाड्यांमध्ये सहरसा-अमृतसर गरीब रथ (Garib Rath) ट्रेनचा क्रमांक पहिला आहे. ही रेल्वे अमृतसरहून बिहारच्या दिशेनं जाते. यामध्ये प्रवास करणाऱ्यांची गर्दी पाहून मुंबई लोकल (Mumbai Local) परवडली असंच तुम्हीही म्हणाल. 

अस्वच्छतेसाठी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या या रेल्वेव्यतिरिक्त जोगबनी-आनंद विहार सीमांचल एक्सप्रेस ट्रेन, श्री माता वैष्णो देवी-बांद्रा स्वराज एक्सप्रेस ट्रेन, बांद्रा-श्री माता वैष्णो देवी स्वराज एक्सप्रेस ट्रेन आणि फिरोजपुर- अगरतला त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेस ट्रेन या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड अस्वच्छता असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

हेसुद्धा पाहा : Republic Day 2023 : नवं वर्ष नवा फेटा; पंतप्रधान मोदींचा लूक पुन्हा एकदा चर्चेत   

आनंद विहार-जोगबनी सीमांचल एक्स्प्रेस, अमृतसर क्लोन स्पेशल ट्रेन, अजमेर-जम्मू तवी पूजा एक्सप्रेस ट्रेन आणि नवी दिल्ली - डिब्रूगढ़ राजधानी एक्सप्रेस मध्येही प्रवाशांनी अस्वच्छतेच्या तक्रारी केल्या आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एका महिन्यामध्ये या रेल्वेगाड्यांच्या अस्वच्छतेबाबतच्या तक्रारींचा आकडा 1079 इतका आहे. 

अस्वच्छता, आसनांच्या खाली असणारा कचरा, पाण्याची गैरसोय, शौचालयांची अस्वच्छता, अंगावर घेण्यासाठी दिली जाणारी पांघरूणं अस्वच्छ असणं अशा अनेक तक्रारी प्रवाशांनी नोंदवल्या आहेत. कुठे आसन व्यवस्था चांगली नाही, कुठे खिडक्यांवर धुळ आहे, कुठे चार्जिंग पॉईंट काम करत नाहीत अशा तक्रारीसुद्धा आतापर्यंत अनेकदा करण्यात आल्या आहेत. 

प्रवासी म्हणून तुमची जबाबदारी ओळखा 

एखाद्या गोष्टीबाबत आपली गैरसोय होताच आपण त्यासाठी नाराजीचा सूर आळवू लागतो. पण, हीच गैरसोय कुणामुळं होते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? बऱ्याचदा अनेक प्रवासी रेल्वेनं प्रवास करताना अतिशय बेजबाबदारपणे वागतात. आपल्या आसनांखाली कचरा ढकलणं, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आसनांवर ठेवणं अशी कृत्य करताना दिसतात. त्यामुळं या साऱ्याला आपणच जबाबदार आहोत. तेव्हा किमान आपली जबाबदारी ओळखण्यावरही प्रवाशांनी लक्ष देणं गरजेतं आहे. नाही का?