Shocking News : शॉपिंग मॉलमध्ये (Shopping Mall) एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने (College Student) चॉकलेट चोरलं. हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला. ती शिकत असलेल्या कॉलेजमध्येही अनेक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिला गेला. ही गोष्ट त्या मुलीच्या मनाला प्रचंड लागली आणि तीने टोकाचं पाऊल उचललं.
पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) अलीपुरद्वार जिल्ह्यातली ही घटना आहे. पोलिसांनी (Police) या बातमीला दुजोरा दिला आहे. मृत मुलगी जयगाव परिसरातील सुभाष पल्ली कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी 29 सप्टेंबरला आपल्या लहान बहिणीबरोबर एका शॉपिंग मॉलमध्ये गेली होती. मॉलमधून बाहेर बडताना सिक्युरिटी गार्डने चॉकलेट चोरल्याच्या आरोपाली खाली तिला पकडलं.
मुलीने मागितली माफी
सिक्युरिटी गार्डने पकल्यानंतर त्या मुलीने चॉकलेटची (chocolates) किंमत चुकती केली आणि शॉपिंग मॉलमधल्या अधिकाऱ्यांची माफि मागितली. पण हे सर्व घडत असताना मॉलमध्ये उपस्थित असलेल्या काही लोकांनी तिचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ अनेकजणांनी पाहिला. त्यामुळे मुलीची बेईज्जती झाली. ही गोष्ट ती सहन करु शकली नाही आणि तीने आत्महत्येचा मार्ग निवडला.
या घटनेनंतर स्थानिक लोकांनी शॉपिंग मॉलबाहेर आंदोलन केलं. व्हिडिओ बनवणाऱ्या आणि ऑनलाईन व्हायरल करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. मृत मुलीच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार शॉपिंग मॉलमधल्या एका कर्मचाऱ्यानेच तिचा व्हिडिओ बनवला होता आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.