डॉक्टरांनी ठरवलं मृत, पण शव-कक्षात ठेवल्यावर ती जिवंत... नक्की असं काय घडलं

या महिलेचा मृत्यू झाला असे सांगत, डॉक्टरांनी महिलेच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये ठेवण्यासाठी सांगितले.

Updated: Feb 26, 2022, 06:48 PM IST
डॉक्टरांनी ठरवलं मृत, पण शव-कक्षात ठेवल्यावर ती जिवंत... नक्की असं काय घडलं title=

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर चंबळ झोनमधील सर्वात मोठ्या जयारोग्य हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचे विचित्र कृत्य समोर आले आहे. ही घटना ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. जयारोग्य रुग्णालयातील डॉक्टरांनी एका जिवंत महिलेला मृत घोषित केलं. परंतु जेव्हा लोकांना समजलं की, ही महिला जिवतं आहे, तेव्हा सर्वत्र एकच खळबळ उडाली. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला असे सांगत, डॉक्टरांनी महिलेच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये ठेवण्यासाठी सांगितले.

परंतु जेव्हा सर्व कुटुंबीय महिलेचा मृतदेह पोस्ट मॉर्टम रुममध्ये घेऊन गेले, तेव्हा या महिलेच्या नवऱ्याने जेव्हा तिच्या हृदयाजवळ हात ठेवला, तेव्हा त्याला आपल्या बायकोचे ठोके सुरू असल्याचे जाणवले.

बायकोच्या हृदयाचे ठोके ऐकून नवरा थक्क

जेव्हा नवरा नरपत सिंह राजपूत याला आपल्या बायकोच्या हृदयाचे ठोके ऐकू आले तेव्हा तो थक्क झाला. त्यानंतर तेथे एकच गर्दी जमली. त्यानंतर कुटुंबीयांनी महिलेला तातडीने रुग्णालयात आणून उपचार सुरू केले.

ऍनेस्थेसिया डॉक्टरांनी मृत घोषित केले

महिलेचा पती नरपत सिंग राजपूत, जो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे, त्याने सांगितले की, दोन दिवसांपूर्वी त्याची पत्नी रामवती हिचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना झाशी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर अवस्थेत त्यांना ग्वाल्हेरच्या जयारोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याच रात्री 

या घटनेबाबत सांगताना जयआरोग्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे आणि ते चौकशी करत आहेत. यामध्ये जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.