VIDEO: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर बूट भिरकावला

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर एका सभेत बूट फेकण्यात आलाय. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 20, 2018, 10:44 PM IST
VIDEO: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर बूट भिरकावला

भुवनेश्वर : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर एका सभेत बूट फेकण्यात आलाय. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

Add Zee News as a Preferred Source

बारगढ येथे आयोजित सभेत पटनायक यांच्यावर बूट फेकण्यात आला. मात्र, त्यांच्या सुरक्षारक्षकाने तो बूट रोखला. त्यामुळे आरोपीने फेकलेला बूट हा मुख्यमंत्री पटनायक याना लागला नाही.

सुरक्षा रक्षकांनी तातडीने पटनायक यांना तात्काळ घटनास्थळावरुन दूर नेले. तसेच आरोपी व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.

व्हिडिओत दिसत आहे की, नवीन पटनायक नागरिकांना संबोधित करत आहेत. त्याच दरम्यान, एक बूट त्यांच्या दिशेने येतो आणि स्टेजला लागतो. त्यानंतर सुरक्षारक्षक समोर येतात. मग आणखीन एक बूट फेकण्यात येतो पण हा बूट सुरक्षारक्षक रोखतो.

काही दिवसांपूर्वीच नवीन पटनायक यांच्यावर एका रॅली दरम्यान अंडे फेकण्यात आले होते. मात्र, ही अंडी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकले नव्हते. अंड फेकल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली होती.

About the Author