कर्नाटकमध्ये चार बंडखोर आमदारांवर कॉंग्रेस करणार कारवाई

पार्टीकडून व्हीप जारी करुनही रमेश जरकीहोली, उमेश जाधव, महेश कुमथली, बी नागेंद्र आणि जेएन गणेश हे बैठकीत उपस्थित नव्हते. 

Updated: Feb 8, 2019, 08:45 PM IST
कर्नाटकमध्ये चार बंडखोर आमदारांवर कॉंग्रेस करणार कारवाई  title=

बंगळूरु : कर्नाटकमध्ये राजकीय वादळ घोंघाऊ लागले आहे. कॉंग्रेस 5 आमदारांनी आतापर्यंत बजेट सत्रात हिस्सा घेतला नाही. पार्टीकडून व्हीप जारी करुनही रमेश जरकीहोली, उमेश जाधव, महेश कुमथली, बी नागेंद्र आणि जेएन गणेश हे बैठकीत उपस्थित नव्हते. कॉंग्रेसने अशा बंडखोर आमदारांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही विधानसभा स्पिकर रमेश कुमार यांना भेटून या बंडखोर आमदारांविरोधात कारवाई करणार असल्याचे कॉंग्रेस नेता सिद्धरमैया यांनी सांगितले. रमेश जरकीहोली, उमेश जाधव, महेश कुमथली आणि बी नागेंद्र यांच्याविरोधात ही कारवाई होणार आहे. या आमदारांव्यतिरिक्त सर्व आमदारांची बैठकीत उपस्थिती होती असेही त्यांनी सांगितले. 

रोशन बेग आणि बीसी पाटील नावाच्या दोन आमदारांनीही कॉंग्रेसच्या बैठकीत भाग घेतला नव्हता. पण त्यांनी याची पुर्व परवानगी घेतली होती. एका रिसॉर्टवर आपल्या सहकाऱ्यासोबत झालेल्या झटापटीत गणेशला फरार घोषित करण्यात आले होते. चार आमदारांनी मला पत्र लिहून विधानसभेच्या पूर्ण सत्रात सहभागी होऊ शकणार नसल्याचेही सिद्धारमैया यांनी सांगितले. 

सरकार पाडण्याचा भाजपाचा दावा मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी फोल ठरवत पत्रकार परिषद घेऊन दोन ऑडीओ क्लीप जारी केल्या. दोन ऑ़डिओ क्लीप अशा आहेत ज्यामध्ये येदियुरप्पा आणि जेडीएस आमदार नागनगौडा यांचा मुलगा शरण गौडा यांच्यातील फोनवरील संभाषण असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पैशांचे आमिष दाखवून नागनगौडा यांना आपल्या बाजुने करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. 

यदियुरप्पा यांनी आपल्या वडीलांना लालस दाखवली याबद्दल कुमारस्वामी यांच्या सोबत असलेल्या शरण याने सांगितले. या पत्रकार परिषदेत क्लिप मधील एकच अस्पष्ट भाग ऐकवला. या क्लीपमध्ये एका पुरूषाचा आवाज येत आहे जो पैसे आणि मंत्री पदाबद्दल बोलत आहे. जर पक्ष बदल विरोध कायद्याअंतर्गत घेरल गेल्यास कशाप्रकारे तो स्पीकर आणि न्यायाधीशांना संभाळून घेईल यासंदर्भात तो शरण गौडा यांना आश्वस्त करत आहेत, असे या कथित क्लीपमधून ऐकवण्यात आले.