दिवाळीच्या मुहूर्तावर स्मॉल बिझनेस करा सुरू; कमीत कमी गुंतवणुकीतून मिळवा पैसाच पैसा

Small Business ideas जर तुम्हाला कमी पैशात आपला लहान व्यवसाय सुरू करायचा आहे. तर LED Bulb चा बिझनेस मोठी कमाई मिळवून देऊ शकतो.

Updated: Oct 9, 2021, 01:27 PM IST
दिवाळीच्या मुहूर्तावर स्मॉल बिझनेस करा सुरू; कमीत कमी गुंतवणुकीतून मिळवा पैसाच पैसा title=

 

नवी दिल्ली : या दिवाळीच्या मुहूर्तावर छोटा व्यवसाय स्थापन करण्याचे नियोजन करीत असाल तर, यासाठीचे लवकर नियोजन करणे आवश्यक आहे. दिवाळीच्या आधी या व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. हा व्यवसाय म्हणजे LED Bulb Business होय. एलईडी बल्बला नेहमीच मागणी असते. या बल्बच्या वापरामुळे इलेक्ट्रिक बीलामध्येही घट झाली आहे. या व्यवसायतून अनेक लोकांना रोजगारही मिळाला आहे.

एलईडी बल्बमुळे वीजेचा खर्च कमी होतो. आणि चांगला प्रकाश पडतो. बल्ब प्लास्टिकपासून बनल्याने पडून तुटण्याची शक्यता कमी असते. एका एलईडी बल्बची लाइफ साधारणतः 50 हजार तास इतकी किंवा त्यापेक्षा कमी असते. विशेषतः एलईडीमध्ये सीएफएल बल्ब सारखा पारा नसतो. त्यामुळे लिड (lead) आणि निकेल (Nickel) सारखे घटक असतात.

स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे तर त्यासाठी तुम्हाला छोटेशी गुंतवणूक करावी लागेल. कमीत कमी गुंतवणूकीतून LED बल्ब बनवण्याचा व्यवसाय उत्तर आहे. मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेसअंतर्गत अनेक संस्था एलईडी बल्ब बनवण्याची ट्रेनिंग देतात. ज्यासाठी जागो जागी स्वयंरोजगार कार्यक्रमच्या अंतर्गत ट्रेनिंग देण्यात येते. 

याशिवाय कौशल्य विकास संस्थांतर्फे एलईडी बल्ब बनवण्यासाठी सामान देखील देते. तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करून कॉन्ट्रक्ट करू शकता. हा व्यवसाय तुम्ही 50 हजार रुपयांपासूनही सुरू करू शकता. यासाठी दुकान किंवा कारखान्यासाठी जागेची गरज नाही. तुम्ही घरी सुद्धा मोकळ्या जागेत हा व्यवसाय सुरू करू शकता.