नवी दिल्ली : सरकारने सप्टेंबर तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांसाठी व्याज दरांमध्ये बदल न केलेला नाही. म्हणजेच सरकारच्या निर्णयामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
पोस्ट ऑफिस अनेक बचत योजना चालवते. विशेष म्हणजे या बचत योजनांना सरकारी गॅरेंटी असते. म्हणजेच तुमचा पैसा सुरक्षित असतो. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुमचा पैसा काही काळानंतर दुप्पट होऊ शकतो. जाणून घ्या विशेष योजनांबाबत...
1 पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट
कालावधी - 1 ते 3 वर्ष
व्याज दर 5.5 टक्के
गुंतवणूकीनंतर 13 वर्षांनी पैसे दुप्पट
पाच वर्षांच्या टाइम डिपॉजिटवर 6.7 टक्के व्याज
2 पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट
व्याज दर 5.8 टक्के
या योजनेत पैसे गुंतवल्यास 12.41 वर्षांनी पैसे दुप्पट
3 पोस्ट ऑफिस सेविंग बँक अकाउंट
व्याज दर 4 टक्के
गुंतवणूक दुप्पट होण्यास दीर्घ कालावधी अपेक्षित
4 पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्किम
व्याज दर 6.6 टक्के
गुंतवणूकीनंतर 10.91 वर्षांनी पैसे दुप्पट
5 पोस्ट ऑफिस सीनियर सिटिजन्स सेविंग स्किम
व्याज दर 7.4 टक्के
गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी 9 वर्षे
6 पोस्ट ऑफिस PPF
पोस्ट ऑफिसच्या 15 वर्षाच्या PPFवर 7.1 टक्क्यांचा व्याजदर मिळतो.
तर गुंतवणूकीनंतर पैसे दुप्पट होण्यास 10.14 वर्षांचा वेळ लागतो.
7 पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खाते
मुलींसाठी चालवण्यात येणारी विशेष स्किम
व्याज दर 7.6 टक्के
गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी 9.47 वर्षे
8 पोस्ट ऑफिस नॅशनल सेविंग सर्टिंफिकेट
व्याज दर 6.8 टक्के
कालावधी 5 वर्षे
याच व्याजदरानुसार गुंतवणूक दुप्पटीचा कालावधी 10.59 वर्षे