close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अमेठीत कार्यकर्त्याची हत्या, स्मृती इराणींचा पार्थिवाला खांदा

अमेठी मतदारसंघातील स्मृती इराणी यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Updated: May 26, 2019, 04:38 PM IST
अमेठीत कार्यकर्त्याची हत्या, स्मृती इराणींचा पार्थिवाला खांदा

अमेठी : अमेठी मतदारसंघातील स्मृती इराणी यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेत स्मृती इराणी सहभागी झाल्या. यावेळी स्मृती इराणी यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. इराणी यांनी सिंह यांच्या पार्थिवाला खांदा दिला.

स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची बरौलिया या गावात हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री साडे अकरा वाजता बरौलिया या गावात घरात घुसून त्यांना अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घातल्या. या प्रकरणी पोलिसांनी ६ ते ७ संशयितांना ताब्यात घेतलं आहे. तीन गट बनवून पोलिसांनी छापेमारीला सुरूवात केली आहे.

बरौलिया या गावाचे सुरेद्र सिंह माजी सरपंच होते. गोळीबार झाल्यावर त्यांना उपचारांसाठी लखनऊला हलवण्यात आलं. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेंद्र सिंह हे स्मृती इराणी यांचे अतिशय जवळचे समजले जात. इराणींच्या प्रचारातही त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. या हत्येची उत्तर प्रदेश सरकारनंही गंभीर दखली घेतली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत.