सोनिया गांधी गंगाराम रुग्णालयात दाखल

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

Updated: Feb 2, 2020, 10:04 PM IST
सोनिया गांधी गंगाराम रुग्णालयात दाखल  title=

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात दुखण्याच्या कारणामुळे त्यांना रुग्णालयात नेल्याची माहिती सुत्रांनी दिली. तिथे त्यांच्यावर काही चाचण्या केल्या गेल्या. काँग्रेसच्या महासचिव आणि मुलगी प्रियांका गांधी वाड्रा यादेखील रुग्णालयात उपस्थित होत्या. 

गेल्यावर्षी पर्यंत सोनिया गांधी या तपासणीसाठी अमेरिकेत जायच्या. त्यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा हे देखील सोबत असतं.