'स्टॅच्यु ऑफ युनिटी'... जगातील सर्वात उंच मूर्ती तयार!

'स्टॅच्यु ऑफ युनिटी'चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत 

Updated: Oct 12, 2018, 02:18 PM IST
'स्टॅच्यु ऑफ युनिटी'... जगातील सर्वात उंच मूर्ती तयार! title=

अहमदाबाद : गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर बांधाजवळ बनवण्यात येणारी सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती अर्थात 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' आता जवळपास पूर्ण झालीय. 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑक्टोबर रोजी करणार आहेत. जगातील ही सर्वात उंच मूर्ती असेल असा दावा करण्यात येतोय. 

'स्टॅच्यु ऑफ युनिटी'ची मूर्ती बनवण्यासाठी तब्बल पाच वर्ष लागलेत. १८२ मीटर उंच सरदार पटेल यांचा हा पुतळा बनवण्यासाठी चार धातुंचा वापर करण्यात आलाय. या मूर्तीला हजारो वर्ष गंज लागणार नाही, असंही सांगण्यात येतंय. 

आर्किटेक्ट पद्मश्री राम सुतार आणि त्यांच्या मुलानं 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'ची मूर्ती घडवलीय. ही मूर्ती सात वेगवेगळ्या भागांत तयार करण्यात आलीय. त्यानंतर गुजरातमध्ये एकत्र आणून त्याची स्थापना करण्यात येणार आहे. 

सरदार पटेल यांची ही मूर्ती ६.५ तीव्रतेचा भूकंप झेलू शकेल... इतकंच नाही तर २२० किलोमीटर प्रती तास वेगानं वाहणारं वादळही या मूर्तीला हानी पोहचवू शकणार नाह, असं सांगण्यात येतंय.