Share Market Live | शेअर मार्केटची तुफान उसळी; सेन्सेक्स 533 अंकांनी मजबूत; निफ्टी 18200 च्या पार

Share Market Live: Sensex, Nifty Log Gains Fourth Day too : जागतिक बाजारातील तेजीच्या संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारातही मोठी तेजी दिसून आली. भारतीय बाजारांच्या आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणासह बंद झाले. सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीने 18200 चा टप्पा पार केला आहे.

Updated: Jan 12, 2022, 04:31 PM IST
Share Market Live | शेअर मार्केटची तुफान उसळी; सेन्सेक्स 533 अंकांनी मजबूत; निफ्टी 18200 च्या पार title=

मुंबई : जागतिक बाजारातील तेजीच्या संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारातही मोठी तेजी दिसून आली. भारतीय बाजारांच्या आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणासह बंद झाले. सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीने 18200 चा टप्पा पार केला आहे.

हेवीवेट स्टॉकमध्ये जोरदार ऍक्शन दिसून आली. सेन्सेक्स 30 मधील 18 शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. निफ्टीवर ऑटो इंडेक्स 1.5 टक्के आणि मेटल इंडेक्स सुमारे 1.5 टक्क्यांनी वधारला. त्याचवेळी बँक आणि वित्तीय शेअर्समध्येही तेजी दिसून आली.

आजच्या व्यवहारांत आयटी आणि फार्मा निर्देशांकांवर दबाव होता. रियल्टी आणि एफएमसीजी शेअर्समध्येही चांगली खरेदी नोंदवली गेली. सध्या सेन्सेक्स 533 अंकांनी वधारला असून तो 61150 च्या पातळीवर बंद झाला आहे. तर निफ्टी 157 अंकांनी वाढून 18212 च्या पातळीवर बंद झाला आहे. 

आजच्या टॉप गेनर्समध्ये M&M, BHARTIARTL, INDUSINDBK, RELIANCE, ICICIBANK, TATASTEEL, NTPC, BAJFINANCE, INFY आणि HDFC या शेअर्सचा समावेश आहे. सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजार तेजीत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे.