Stock to Buy | गुंतवणूकीसाठी साखर आणि सिमेंट सेक्टरचे हे 2 दमदार शेअर; मोठ्या कमाईची संधी

मार्केट एक्सपर्ट्स विकास सेठी यांनी कॅश मार्केटमधील 2 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

Updated: Nov 9, 2021, 08:34 AM IST
Stock to Buy | गुंतवणूकीसाठी साखर आणि सिमेंट सेक्टरचे हे 2 दमदार शेअर; मोठ्या कमाईची संधी title=

 

मुंबई : शेअर बाजारात खरेदी करण्यासाठी मार्केट एक्सपर्ट आणि सेठी फिनमार्टचे एमडी विकास सेठी यांनी 2 दमदार शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, हे दोन्ही शेअर शॉर्ट टर्म गुंतवणूकीत मोठी कमाई करून देण्याची क्षमता ठेवतात. 

Dhampur Sugar 
विकास सेठी यांनी साखर उद्योग क्षेत्रातील कंपनी धमपूर शुगरच्या शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. विकास सेठी यांनी म्हटले की, सध्याच्या काळात साखर उद्योग चांगले काम करीत आहे. साखर उद्योग साखरे सोबतच इथेनॉलची सुद्धा निर्मिती करीत आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये साखरेची मागणी वाढल्याने साखरेच्या किंमती वाढल्या होत्या. आता एक्सपर्ट्सने या शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे

Dhampur Sugar - Buy Call
CMP - 313.45
Target - 330
Stop Loss - 300

कंपनीचे फंडामेंटल्स
कंपनीचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग आहेत. कंपनीचे रिटर्न रेश्यो चांगले आहेत. कंपनाचा डेट इक्विटी रेश्यो 0.6 टक्क्यांच्या आसपास आहे. हा शेअर 9-10 च्या PE मल्टीपलमध्ये काम करतो. उद्या कंपनीचे निकाल येणार आहेत.

Heidelberg Cem 
सेठी यांनी दुसरा दमदार शेअर सिमेंट क्षेत्रातून निवडला आहे. या कंपनीची सिमेंट बनवण्याची क्षमता 6.3 मिलियन टन इतकी आहे. या कंपनीचे प्लांट मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आहेत.

Heidelberg Cem - Buy Call
CMP - 253.45
Target - 270
Stop Loss - 245

कसे आहेत कंपनीचे फंडामेंटल्स?
कंपनीच्या फंडामेंटल्सच्या बाबतीत एक्सपर्ट्स सकारात्मक आहेत. कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 20-21 टक्क्यांच्या आसपास आहे. रिटर्न ऑन इक्विटी 21 टक्के आहे.