Stray Dogs Video: पाळीव कुत्र्याचा (Pet Dog) हल्ल्याच्या घटना वाढताना दिसतं आहे. पिटबूलमुळे (Pitbull) काही महिन्यापूर्वी लखनऊमधील (Lucknow) महिलेचा मृत्यू (woman Death) झाला. त्यानंतर पिटबूल दहशतीची आणखी एक घटना समोर आली. एक लहान मुलगा उद्यानात खेळ असताना त्याचा पिटबूलने हल्ला केला. या हल्ल्यात मुलाच्या चेहऱ्यावर टाके पडले. तर मुंबईतही (Mumbai) लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याने एका व्यक्तीवर हल्ला केला. अशातच भटक्या कुत्र्यांमुळेही काही शहरामध्ये नागरिक त्रस्त आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल (viral) झाला आहे.
हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, दोन विद्यार्थी वेगाने धावत येत आहेत आणि थोड्याच वेळात कुत्र्यांची गँग मागे धावत येते. एका घरचं गेट उघडं पाहून हे दोन विद्यार्थी त्या घरात घुसतात आणि दरवाजा लावून घेतात. यानंतर कुत्र्यांचा कळप परततो.जर मुलांना या घराचा आसरा मिळाला नसता तर या कुत्र्यांचा जीवच घेतला असता. हा व्हिडीओ पाहून आपल्या हृदयाचे ठोके चुकतात.
या व्हिडीओमध्ये पुढे अजून एक रात्रीची क्लिप आहे. ज्यामध्ये एक महिला निर्जन रस्त्यावरुन चालत जात असताना कुत्र्यांची टोळी तिच्यावर हल्ला करतो. हे धक्कादायक घटना केरळमधील आहे. पहिली घटना ही कुन्नूरची (Coonoor) आहे. केरळमध्ये (Kerala)भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत आहे. रस्त्यांवरून फिरणं सर्वसामान्य लोकांची कठीण झालं आहे. (stray dogs attacking humans horrible and shocking video viral on social media nm)
#WATCH | Kerala: Students in Kannur manage to escape unharmed as stray dogs chase them in the locality (12.09) pic.twitter.com/HPV27btmix
— ANI (@ANI) September 13, 2022
गेल्या काही दिवसांमध्ये केरळमध्ये रेबीजमुळे (rabies) होणाऱ्या मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे. हिंसक कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत आहेत. एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ जारी केला आहे.
अलीकडेच केरळमधून आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये कोझिकोडमध्ये (Kozhikode) एका 12 वर्षांच्या मुलावर हल्ला करण्यात आला आहे. नूरज (Nooraj) असं या मुलाचं नाव होते. तो त्याच्या घराबाहेर सायकल चालवत होता. तेवढ्यात अचानक एक भटका कुत्रा आला आणि त्याला चावू लागला. ही घटना एका सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. मात्र, त्याच्या मित्राच्या कुटुंबीयांनी त्याला कुत्र्यापासून कसेतरी वाचवले. याच कुत्र्याने आणखी चार जणांवर हल्ला केला.
तर केरळमध्ये 12 वर्षांची मुलगी रेबीजची शिकार झाली. तिला तीन रेबीज प्रतिबंधक लसी (Rabies vaccine) देण्यात आल्या. तरीदेखील तिचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. या मुलीला 24 ऑगस्टला पथनामथिट्टा (Pathanamthitta) येथील घराजवळ एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला आणि स्थानिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला शुक्रवारी तज्ज्ञ उपचारांसाठी कोट्टायम मेडिकल कॉलेज रुग्णालयात (Kottayam Medical College Hospital) हलवण्यात आले. मात्र तिला वाचवता आलं नाही.