'कमी शिकलोय म्हणून जास्त कमवतोय, कॉर्पोरेटमध्ये असतो तर...'; डोसा विक्रेत्याने शून्य मिनिटात केला अपमान

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एका डोसा विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये डोसा विक्रेत्याने नोकरी करणाऱ्यांना दिलेली चपराक ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 15, 2024, 06:10 PM IST
'कमी शिकलोय म्हणून जास्त कमवतोय, कॉर्पोरेटमध्ये असतो तर...'; डोसा विक्रेत्याने शून्य मिनिटात केला अपमान title=

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ निव्वळ टाईमपाससाठी असतात तर काही थोड्या वेळासाठी हसवणारे. काही व्हिडीओ हे जुन्या आठवणींना उजाळा देतात तर काही व्हिडीओ हे प्रेरणादायी असतात. व्हायरल व्हिडीओंमध्ये असेही काही व्हिडीओ असतात जे कधीकधी आपण आयुष्यात काहीच केलं नाही अशी भावना देखील मनात आणतात. आठ नऊ तास ऑफिसमध्ये मेहनत करुन मनासारखे पैसे मिळत नाहीत असे अनेकांना वाटतं. पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ फिरतोय ज्याने नोकरदारांचा काही सेकंदांमध्ये अपमान केला आहे.

रस्त्याच्या कडेला उभं राहून खाद्यपदार्थ विकणारे देखील मेहनतीने भरपूर पैसे कमावतात. मात्र तरीही कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी त्यांना कमी दर्जाचे समजतात. मात्र आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये रस्त्यावर डोसा विकणाऱ्या एका व्यक्तीने महिन्याला 30-40 हजार रुपये कमावणाऱ्या लोकांना चांगलाच फटकारले आहे. डोसा बनवणाऱ्या या व्यक्तीने सांगितले की, तो कमी शिकलेला आहे हे चांगले आहे, अन्यथा त्यालाही 30-40 हजार रुपयांची नोकरी करावी लागली असती.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये डोसा विक्रेत्याचा हजरजबाबीपणा ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये विक्रेता अमूल बटरचे पॅकेट दाखवताना गंमतीने म्हणतो की तो कमी शिकलेला आहे, त्यामुळे त्याला ब्रँडचे नाव वाचता येत नाही. यानंतर तो म्हणतो की तो कमी शिकलेला असल्यामुळे जास्त कमावत आहे, कारण कॉर्पोरेटमध्ये लोकांना फक्त 30,000 ते 40,000 रुपये पगार मिळतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आल्यापासून तो व्हायरल होऊ लागला असून त्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @superhumour अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.

डोसा विक्रेत्याचे सडेतोड उत्तर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये डोसा बनवणारी व्यक्ती त्याच्या ग्राहकांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतो की, 'मी कमी शिकलेला असल्यामुळे मी जास्त कमावतोय, नाहीतर मीही कुठेतरी तीस-चाळीस हजार रुपयांचे काम केले असते.'

 

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून कोट्यवधी लोकांनी तो पाहिला आहे. त्याचबरोबर पाच लाखांपेक्षा अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे.  या व्हिडीओवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका यूजरने, 'भाईने कॉर्पोरेट गुलामांना काही सेकंदात रोस्ट केले,' असे म्हटलं आहे. दुसऱ्या एका युजरने, 'माझे भावनिक नुकसान झाले आहे,' असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने 'डोसा जास्त खारट दिसतोय, हे माझ्या अश्रूंमुळे आहे', असे म्हटलं आहे.