कोलकाता : Chaiwali : जर तुम्ही पश्चिम बंगालमधील हाबरा रेल्वे स्थानकावर गेलात तर येथे तुम्हाला असे एक चहाचे दुकान पाहायला मिळेल, जे आजकाल खूप प्रसिद्ध झाले आहे. कारण आहे या दुकानाचे नाव आणि ते चालवणाऱ्या मुलीचे. वास्तविक, एमए पास तुकतुकी दास हिने तिच्या दुकानाचे नाव 'एमए इंग्लिश चायवाली' (MA English Chaiwali) ठेवले आहे, जे लोकांच्या पसंतीस उतरले आहे. तुकतुकी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
तुकतुकी दास (Tuktuki Das) ही मूळची बंगालची असून ती तिच्या कामामुळे एका रात्रीच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. नोकरी न मिळाल्याने तिने चहाचे दुकान उघडले आणि त्याचे नाव 'एमए इंग्लिश चायवाली' (MA English Chaiwali) ठेवले. तुकतुकीची कहाणी व्हायरल झाल्यानंतर दूरदूरवरून लोक तिला भेटायला येत आहेत.
तुकतुकी दास (Tuktuki Das) हिने इंग्रजीमध्ये एमए (MA English) केले आहे, पण खूप प्रयत्न करूनही नोकरी न मिळाल्याने तिने चहाचे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. तुकतुकीने उत्तर 24 परगणा येथील हाबरा स्टेशनवर चहाचे दुकान उघडले. या दुकानाला तिने 'एमए इंग्लिश चायवाली' (MA English Chaiwali) असे नाव दिले. दुकानाच्या या अनोख्या नावामुळे ती हळूहळू प्रसिद्ध झाली. स्थानिक प्रसारमाध्यमांनीही तिची स्टोरी प्रसिद्ध केली.
तुकतुकीचे (Tuktuki Das) वडील व्हॅन ड्रायव्हर आहेत आणि आईचे छोटे किराणा दुकान आहे. तुकतुकीच्या चहा विकण्याच्या योजनेवर सुरुवातीला पालक नाराज झाले होते. यातून काहीही साध्य होणार नाही, लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलतील, असे त्यांनी तिला समजावले होते. पण तिने ऐकले नाही. वास्तविक, तुकतुकी ही 'एमबीए चायवाला'च्या कथेने प्रेरित झाली होती. ती तिने इंटरनेटवर वाचली होती. त्यामुळे विरोध होऊनही ती मागे हटली नाही.
तुकतुकी दास (Tuktuki Das) म्हणाली की, मला वाटले की कोणतेही काम छोटे नसते आणि म्हणूनच मी 'एमबीए चायवाला' सारखे माझे चहाचे दुकान उघडले. सुरुवातीला जागा मिळणे कठीण झाले होते, परंतु नंतर मी ते शोधण्यात यशस्वी झाले. आता मी चहा आणि नाश्ता विकते. माझ्याकडे एमएची पदवी आहे, म्हणून मी दुकानाचे नाव असे ठेवले आहे. टुकटुकी तिचे स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील चालवते. तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ती म्हणाली, 'मला जेव्हापासून प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासून अनेक लोक मला भेटायला येतात, लोक मला प्रोत्साहन देतात, असे ती आवर्जून सांगते.