success story : अवघ्या 24 व्या वर्षात सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी जेव्हा IAS होते

IAS अधिकारी झालेल्या ममता यादव हरियाणातील गुरुग्राममधील बसई गावातील रहिवासी आहेत.

Updated: Oct 30, 2021, 07:32 PM IST
success story : अवघ्या 24 व्या वर्षात सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी जेव्हा IAS होते title=

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने गेल्या महिन्यात नागरी सेवा परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत 24 वर्षीय ममता यादव ही मूळची हरियाणाची असून, तिने अखिल भारतीय क्रमवारीत 5 वा क्रमांक पटकावला आहे. ममता यादवची IAS अधिकारी बनण्याची कहाणी खूप प्रेरणादायी आहे, तिचे वडील खाजगी नोकरी करायचे.

ममता यादवच्या वडिलांचे नाव अशोक यादव आहे. तर तिच्या आईचे नाव सरोज यादव आहे आणि त्या गृहिणी आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ममता यादवने एकदा नव्हे तर दोनदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

ममता यादव सुरुवातीपासून अभ्यासाबाबत फारशा गंभीर नव्हत्या. मिळालेल्या माहितीनुसार, ममता यादवने 12वी नंतर दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आणि कॉलेज संपल्यानंतर लगेचच यूपीएससीची तयारी सुरू केली. IAS अधिकारी झालेल्या ममता यादव हरियाणातील गुरुग्राममधील बसई गावातील रहिवासी आहेत.

ममता यादवने आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने कुटुंबाचे नाव रोशन केले आहे. ममता यादव ही तिच्या गावातील पहिली मुलगी आहे जिने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ममता यादव यांनीही आपल्या यशाचे श्रेय स्वत:च्या अभ्यासाला दिले आहे.