निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषींची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

२२ जानेवारीलाच दोषींना फाशी होणार

Updated: Jan 14, 2020, 03:00 PM IST
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषींची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ज्याअंतर्गत दोषींची क्युरेटिव्ह याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. विनय शर्मा आणि मुकेश यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. 

न्यायमूर्ती आर. भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या ५ न्यायाधीशांच्या संवैधानीक पिठाने ही याचिका फेटाळली. परिणामी आता निर्धारित तारखेला, म्हणजेच २२ जानेवारीला बलात्कार प्रकरणी चारही दोषींना फाशी देण्यात येणार आहे. सकाळी सात वाजता दोषींना फाशी देण्यात येणार आहे. 

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी चार आरोपींपैकी दोघांनी न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. ज्याची सुनावणी न्यायालयात न होता, न्यायाधीशांच्या कार्यालयात झाली. दरम्यान, न्यायमूर्ती भानुमती आणि न्यायमूर्ती भूषण यांच्याकडून १८ डिसेंबरलाच पुनर्विचार याचिका फेटाळली होती. ज्यानंतर पटियाला हाऊसच्या ट्रायल न्यायालयाकडून दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यासंबंधीचा वॉरंट जारी करण्यात आला होता. बलात्कार पीडितेच्या आईकडून दाखल करण्यात आलेल्या अर्जावर ही कारवाई करण्य़ात आली. 

काय होतं प्रकरण? 
१६ डिसेंबर २०१२मध्ये २३ वर्षीय महिलेवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिच्यावर करण्यात आलेल्या अत्याचारांनंतर काही दिवस मृत्युशी झुंत देणाऱ्या निर्भयाने जगाचा निरोप घेतला होता. अतिशय अमानवी कृत्य करणाऱ्या दोषींना त्या क्षणापासूनच कठोर शिक्षा देण्यात येण्याची मागणी सर्वच स्तरांतून करण्यात आली होती. 

वाचा : वारसा हक्कात मिळाली 'जल्लादी', निर्भयाच्या दोषींना पवन देणार फाशी

बलात्कार प्रकरणी सहा दोषींना ताब्यात घेण्यात आलं. ज्यानंतर एक आरोपी अल्पवयीन होता. तर, एका आरोपीने तिहार कारागृहात आत्महत्या केली होती.