Share Market: डिलिस्ट झाली टाटांची 'ही' कंपनी; शेअर्सची देवाण-घेवाण थांबवली, गुंतवणूकदारांनी काय करावं?

Tata Group Share Market: कंपनीनेच यासंदर्भातील सूचनापत्रक जारी करुन माहिती दिली असून गुंतवणूकदारांनी आता त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या शेअर्सचं काय करावं याबद्दलची सविस्तर माहितीही दिली आहे.

Updated: Jan 24, 2023, 10:39 PM IST
Share Market: डिलिस्ट झाली टाटांची 'ही' कंपनी; शेअर्सची देवाण-घेवाण थांबवली, गुंतवणूकदारांनी काय करावं? title=
Tata Group Share Market (File Photo/ Reuters)

Tata Company Delisted: टाटा ग्रुपमधील (Tata Group) सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सच्या (Tata Motors) शेअर्सची न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये म्हणजेच NYSE मधून डी-लिस्ट (Delisting) झाली आहे. टाटा मोटर्सने यासंदर्भातील माहिती देताना न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमधून (New York Stock Exchange) आपल्या शेअर्सची स्वइच्छेने डी-लिस्टिंग केली आहे. सोमवारी व्यवहार संपला तेव्हापासूनच कंपनीचे या शेअर बाजारामधील शेअर्सची खरेदी विक्री बंद झाली.

कंपनीने एक नियामक सूचनेच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. भारतीय कायद्यानुसार लागू करण्यात आलेल्या नियमनासंदर्भातील निर्बंधांमुळे अमेरिकी शेअर बाजारामधील कंपनीने अमेरिकी डिपॉझिटरी रिसीप्टसनंतर (एडीएस) (ADS) सोमवारपासून कंपनीने शेअर्सची देवाण-घेवाण आणि सर्व प्रकारचे व्यवहार बंद केले आहेत. 

गुंतवणूकदारांनी काय करावं?

टाटा मोटर्सने एडीएसधारकांनी आपले शेअर्स न्यूयॉर्क एक्सचेंजच्या डिपॉझटरीकडे जमा करु शकतात असं सांगितलं आहे. 24 जुलै 2023 च्या आधी हे शेअर्स जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. नियोजित वेळेनेनंतर डिपॉझटरीच्या माध्यमातून उरलेल्या साधारण शेअर्सची विक्री करता येऊ शकते. मात्र कंपनीने भारतामध्ये बीएसई आणि एनएईवरील त्यांच्या इक्विटी शेअर्सच्या काराभारावर सध्याच्या या सूचीबद्धतेसंदर्भातील निर्णयाचा कोणताही परिणाम झालेला नाही असंही स्पष्ट केलं आहे.

आयसीआयसीआयबरोबर करार

टाटा मोटर्स लिमिटेड ऑटो क्षेत्रामधील एक सक्रीय लार्ज कॅप कंपनी आहे. या कंपनीचं मार्केट कॅफ 14 हजार 208 कोटी 27 लाख कोटी इतकं आहे. टाटा मोटर्सने सोमवारी यासंदर्भातील घोषणा करताना आपल्या अधिकृत इलेक्ट्रिक वाहन डीलर्सला फायनॅन्सींग सोल्यूशन उपलब्ध करुन देण्यासाठी आयसीआयसीआय बँकेबरोबर भागीदारी केल्याचं जाहीर केलं आहे. या भागीदारीअंतर्ग बँक डिझेल आणि पेट्रोल मॉडेलसाठी डिलर्सला बँकांकडून फंडिगबरोबर अधिकृत इलेक्ट्रिक व्हेइकल डिलर्सला इक्वेट्री फंडिग देणार आहे. 

इलेक्ट्रिक वाहन खरेदी होणार सोपी

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स आणि टाटा फॅसेंजर इलेक्ट्रिक मोबॅलिटीचे शैलेश चंद्र यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. "आमचं डिलर नेटवर्क हे आमच्या उद्योगातील प्रमुख स्तंभांपैकी एक आहे. त्यामुळे आम्ही कायमच प्रयत्नशील आहोत की या माध्यमातून भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची एक लाट निर्माण होईल," असं चंद्र म्हणाले. आयसीआयसीआय बरोबर केलेल्या या करारामुळे इलेक्ट्रिक व्हेइकल्सची निर्मिती अधिक सुलभ आणि खरेदी प्रक्रिया अधिक सोपी होईल असा विश्वासही चंद्र यांनी व्यक्त केला.