रेडिओ जॉकीचे लैंगिक शोषण, गझल गायकास अटक

रेडिओ जॉकीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली गझल गायक के सी राजू श्रीनिवास याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 2, 2018, 05:46 PM IST
रेडिओ जॉकीचे लैंगिक शोषण, गझल गायकास अटक title=

हैदराबाद : रेडिओ जॉकीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली गझल गायक के सी राजू श्रीनिवास याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.

बॉडी मसाजसाठी जॉकीवर दबाव

पीडितेने 29 डिसेंबरला के सी राजू श्रीनिवास याच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत, पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही पेशाने रेडिओ जॉकी असून, जून 2017 पासूत ती श्रीनिवास याला ओळखते. ती 'आलाया वानी' नावाच्या बेब रेडीओत काम करतो होती. हे रेडिओ स्टेशनही श्रीनिवासच चालवत असल्याची माहिती आहे. आरोपी हा पीडितेला बॉडी मसाज करण्यासाठी दबाव टाकत होता, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

प्रायव्हेट फोटोसाठी दबाव

असिस्टंट पोलिस कमिशनर विजय कुमार यांनी दिलेली माहिती अशी की, भा.दं. सं. 354, 354(अ) आणि 509अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने असाही आरोप केला आहे की, श्रीनिवास हा तिच्यावर आपले प्रायव्हेट फोटो पाठविण्यासाठीही दबाव टाकत असे. तसेच, तो सांगतो तसे वागले नाही तर, नोकरीवरून काढून टाकण्याचीही तो सतत धमकी देत असे. 

स्वच्छेनेच तिने दिला बॉडी मसाज

दरम्यान, आपल्यावरील आरोपांचे खंडण करत, आपण तक्रारदार महिलेसोबत नेहमीच पोटच्या मुलीसारखे वर्तन केले. तसेच, आपला नुकताच एक अपघात झाला असून, या अपघातात माझ्या खांद्याला मोठी जखम झाली आहे. त्यामुळे प्रतिदिन एक महिला चिकित्सक येत असे आणि फिजियोथेरपी करत असे. एके दिवशी जेव्हा फिजियोथेरपी करणारी महिला आली नाही तेव्हा, तक्रारदार महिलेने स्वेच्छेने फिजियोथेरपी करण्याची इच्छा व्यक्त केली, अशी प्रतिक्रीया गझल गायक के सी राजू श्रीनिवास याने व्यक्त केली आहे.

करिअर: स्कूल लायब्रेरियन ते गझल गायक असा प्रवास

विशेष असे की, श्रीनिवास यांनी अनेक भाषांमध्ये गझल गाण्यासंबंधी एक विक्रम केला असून, त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आलेली आहे. सध्या 51 वर्षांच्या असलेल्या श्रीनिवास यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात स्कूल लायब्रेरियन म्हणून केली होती.