Terrorist Attack Plan : रेल्वे ट्रॅक, ब्रिज उडवण्याचे प्रशिक्षण, पाकिस्तामधून कॉलिंग अ‍ॅपची मदत

Terrorist Attack Plan : मुंबईतील लोकलमध्ये विषारी गॅस हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट (Terrorist Plan) होता. आता आणखी एक माहिती पुढे आली आहे.

Updated: Sep 18, 2021, 01:19 PM IST
Terrorist Attack Plan : रेल्वे ट्रॅक, ब्रिज उडवण्याचे प्रशिक्षण, पाकिस्तामधून कॉलिंग अ‍ॅपची मदत

मुंबई : Terrorist Attack Plan : मुंबईतील लोकलमध्ये विषारी गॅस हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट (Terrorist Plan) होता. त्याचवेळी जान मोहम्मद यालाही रेल्वे ट्रॅक आणि ब्रिज उडवण्याचं प्रशिक्षण देण्यात आले होते. पाकिस्तानातून (Pakisthan) कॉलिंग अ‍ॅपद्वारे जानला रेल्वे ट्रॅक, ब्रिज उडवून देण्याचे निर्देश दिले गेले होते. हे निर्देश हँडलर मोहम्मद रहिमुद्दीन द्यायचा अशी माहिती पुढे आली आहे. मूळचा मुंबईचा रहिमुद्दीन आता पाकिस्तानात राहत आहे. (Terrorist Attack Plan Made in Pakistan)

मुंबई लोकलमध्ये विषारी गॅस हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट, सुरक्षा वाढवली

राजस्थानातून अटक केलेला जान मोहम्मदला रेल्वे ट्रॅक आणि ब्रिज उडवण्याचे प्रशिक्षण पाकिस्तानमधून देण्यात आले होते, अशी माहिती आता दिल्ली पोलीसांच्या तपासात उघड झाली आहे. पाकिस्तानातून मोहम्मद रहिमुद्दीन एका कॉलिंग अ‍ॅपद्नारे त्याला हे प्रशिक्षण देत होता. रहिमुद्दीन हा मुळचा मुंबईचा आहे पण आता तो पाकिस्तानातून जानला हे प्रशिक्षण देत होता. अनिस इब्राहिम, रहिमुद्दीनला सर्व निर्देश द्यायचा असेही तपासात उघ़ड झाले आहे.

दहशतवादी कटाच्या मास्टरमाईंडला अखेर अटक, मुंबई एटीएसची मोठी कारवाई

 उत्तर प्रदेशातून दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. (ISI terror module mastermind ) नागपाडा भागातून संशयिताला अटक करण्याता आली आहे. मुंबई ATSने धडक कारवाई करत ही अटक केली आहे. दहशतवादी कट प्रकरणात मुंबई एटीएसने मोठी कारवाई केली. नागपाड्यातून संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले. झाकीर नावाचा संशयित दहशतवादी एटीएसने ताब्यात घेतला आहे.