नवी दिल्ली : चिथावणीखोर भाषणं केल्याचा आरोप असणारा वादग्रस्त धर्मगुरू झाकिर नाईक याच्या प्रत्यार्पणाबाबत संभ्रम निर्माण झालाय. झाकिर नाईक सध्या मलेशियात असून, तिथल्या सरकारनं त्याला कायमस्वरूपी तिथं राहण्याची परवानगी दिलीय. मात्र आजच्या त्याला भारतात परत पाठवणार येणार असल्याची माहिती मलेशियन अधिकाऱ्याच्या हवाल्यानं देण्यात आली होती. मात्र खुद्द झाकिर नाईकनं त्याचा इन्कार केला.
तुर्तास तरी भारतात परतण्याची आपली कोणतीही योजना नसल्याचं त्यानं स्पष्ट केलंय. भारत सरकारनं मला खोट्या आरोपांमध्ये गुंतवलंय. जोपर्यंत योग्य न्याय मिळेल अशी खात्री होत नाही, तोपर्यंत आपण भारतात परतणार नाही, असं त्यांनी म्हटले आहे. नाईकवर पैशाची अफरातफर, चिथावणीखोर भाषणं आणि दहशतवादी संघटनांना अर्थिक रसद पुरवल्याचा आरोप आहे. २१ जुलै २०१७ला मुंबईतल्या विशेष न्यायालयानं झाकिर नाईकला सराईत गुन्हेगार घोषित केलं होतं.