मुंबई : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वच देश अनेक प्रयत्न करत आहेत. पण तरी देखील दररोज कोरोनाचे नवे रुग्ण अढळून येत आहेत. कोरोना व्हायरसचं संक्रमन थांबवण्यासाठी सर्वच देश लस शेधण्याच्या प्रयत्नात आहेत. पण कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्या पहिल्या लसीची चाचणी मात्र अपयशी ठरली आहे. वैद्यकिय चाचणी दरम्यान ही लस कोरोनाला थांबण्यासाठी अपयशी सिद्ध झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार गिलीड (Gilead) कंपनीने कोरोनावरील लसीची निर्मिती केली होती. परंतु चीनमध्ये झालेल्या वैद्यकिय चाचणीत ही लस अयशस्वी सिद्ध झाली. रिपोर्टनुसार गिलीड कंपनाची एन्टी व्हायरल रेमडेसीव्हीर (Remdesivir) ही लस कोरोना सारख्या धोकादायक विषाणूवर मात करण्यास अयशस्वी ठरली आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनने दिलेला अहवाल पुर्ण नसल्याचा दावा गिलीड कंपनीकडून करण्यात आला आहे. 'संघटनेकडून सादर करण्यात आलेला अहवाल पूर्ण नाही. वैद्यकिय चाचणीसाठी चीनमध्ये अधिक लोक नसल्यामुळे ही चाचणी अद्याप पुर्ण झाली नसल्याची प्रतिक्रिया गिलीड कंपनीने दिली आहे.