नवी दिल्ली : लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरूवात. लग्नचा दिवस प्रत्येकासाठी खास असतो. लग्न झालं की म्हटलं जात हे नातं 7 जन्मांसाठी असतं. पण काही नाती अशी असतात ती सात जन्म तर दूरचं 17 दिवस देखील टिकत नाही. अशीचं एक घटना झारखंडमधून समोर येत आहे. लग्नाआधी मुलीचं एका मुलासोबत प्रेम संबंध होते. पण घरच्यांनी मुलीचं विवाह तिच्या इच्छे विरूद्ध करून दिलं. लग्न झाल्यानंतर अवघ्या 17 दिवसात नवरी सासर सोडून पळून गेली.
मुलगी थेट तिच्या प्रियकराकडे पोहोचली. प्रियकराने देखील त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. सांगण्यात येत आहे की, रांचीच्या हरमू रोड स्थित न्यू आनंदनगर याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मुलीचं लग्न रातू ठाणे क्षेत्रातील चिपरा गावात 3 जुलै रोजी लग्न झालं. सासरी गेल्यानंतर मुलगी फोनवरून सतत प्रियकराच्या संपर्कात होती.
जेव्हा मुलीची अशी वागणूक सासरच्या लोकांना कळताचं त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांच्यामध्ये ऍग्रीमेंट झालं आणि खुद्द पतीने त्याच्या पत्नी तिच्या प्रियकराला सोपावलं. मुलीला तिच्या सासरी राहायचं नव्हतं असं देखील सांगितलं जात आहे. दोन्ही कुटुंबाने मुलीची समज घातली पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही.
अखेर एक ऍग्रीमेंट करण्यात आला आणि मुलीला तिच्या प्रियकरासोबत जाण्याची परवानगी देण्यात आली. त्या दोघांचं प्रेम प्रकरण गेल्या दीड वर्षांपासून त्यांचे प्रेम संबंध होते.