मुंबई : एक हजार नाही, दोन हजार नाही, तर संपूर्ण एक कोटी पस्तीस लाख रुपये...एमपीच्या बालाघाट येथील एका घरात गाडले गेले. एवढी मोठी रक्कम दोन पोत्यात भरून जमिनीत गाडण्यात आली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस येथे पोहोचले असता घरात उपस्थित असलेल्या महिलेला घाम फुटला. वास्तविक त्याची कथा अशी आहे की, एवढी मोठी रक्कम लपवण्यासाठी या महिलेच्या घराची निवड करण्यात आली होती. हा सर्व ब्लॅक मनी
आहे.
लोकांच्या घरात गाडल्या गेलेल्या खजिन्याची बरीच चर्चा सुरु असते, पण मध्यप्रदेशातील बालाघाटमधील नंबरटोला गावात निशाबाई यांच्या घरी खोदकाम सुरू असताना नोटांचा ढीग साचला. निशाबाई अत्यंत गरीब असून, इकडे-तिकडे छोटी-मोठी कामं करून घर चालवतात. एवढी रक्कम त्यांनी आयुष्यात पाहिली नव्हती. मात्र, या घरातील छोट्या खोलीवर पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्यांना घाम फुटला. कारण त्यांच्या घरात महेश तिडके नावाच्या व्यक्तीने दोन भरलेल्या पोत्या जमिनीत गाडल्या होत्या. महेशने गरीब निशाबाईला काही पैशांचे आमिष दाखवून घरात पुरलेली पिशवीचे रहस्य कोणालाही सांगू नका असे सांगितले.
प्रत्यक्षात कंपनी स्थापन करून अल्पावधीत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखविणाऱ्या टोळीचा बालाघाटात पर्दाफाश झाला. कंपनीच्या या स्किममध्ये अडकलेल्या अनेक निरपराधांनी मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनकडे तक्रार केली होती. त्यानंतर टोळीचा मास्टर माईंड असलेल्या अजय तिडकेसह 11 आरोपींना अटक करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना निशाबाईच्या घराची माहिती मिळाली.
प्रत्यक्षात लोकांच्या मेहनतीची कमाई गुंतवून करत तिप्पट करण्याचा दावा करणारी टोळी पकडली गेली आहे. मुख्य आरोपी सोमेंद्र कांकरायणे, हेमराज अमदरे आणि अजय तिडके यांना पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांच्या कारनाम्यांची माहिती राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली. बालाघाट जिल्हा नक्षलग्रस्त भागांतर्गत येत असल्याने आरोपींकडून यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या १० कोटी रुपयांच्या आधारे आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध असण्याची भीती सरकारने व्यक्त केली होती. ज्यांच्यावर फंडिंगचाही आरोप होता. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून खबऱ्याकडून माहिती मिळताच त्या गरीब महिलेच्या घरावर छापा टाकला.
महिलेच्या घरची अवस्था पाहून पोलीस येण्यापूर्वी ती गरीब नसून करोडपती आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. इतकच काय तर या महिलेलाही माहीत नव्हते. पोलीस आल्यावर खोदकाम सुरू केले असता दोन मोठ्या बॅग जमिनीत गाडल्या गेल्या आहेत असं कळलं. त्यानंतर महिलेसह पोलिसांचे डोळे पाणावले. बॅगेतून नोटांची पाकिटं निघत होती आणि नोटांचा ढीग होता. ते गोळा करून मोजले असता संपूर्ण रक्कम 1 कोटी 35 लाख रुपये निघाली.
यापूर्वी पोलिसांनी दुप्पट पैसे करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करताना अटक केलेल्या आरोपींच्या सांगण्यावरून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून दहा कोटी रुपये जप्त केले होते. एवढी रोकड मोजण्यात आयकर विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घाम फुटला होता. कारवाई थांबू नये म्हणून आसपासच्या जिल्ह्यांतून नोटा मोजण्याचे मशीन मागवावे लागले.
गरीब महिला निशाबाईला पोलिसांनी अटक केली आहे. केंद्र सरकारकडून मिळालेले पत्र आणि संशयाच्या आधारे सखोल तपास सुरू आहे. हे सत्य पुढे पडताळून पाहिलं जाईल की नक्षलवाद्यांना निधी मिळवून देण्याचं काम ही डबल मनी गँग खरंच करतं होती की नाही? 11 आरोपींना अटक केल्यानंतर अशाप्रकारे एवढी मोठी रक्कम दडवल्याचे आढळून आलेले हे मध्यप्रदेशातील अनोखे प्रकरण असल्याचं मत बालाघाटचे एसपी सौरभ सुमन यांनी व्यक्त केलं. भविष्यात या प्रकरणात आणखी अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांना आहे.