नवी दिल्ली : तुम्ही जर पंजाब एण्ड सिंध बॅंकेचे (PSB) ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. बॅंकेने आपल्या सर्व ग्राहकांना कळवले आहे की, जर ते प्रोप्रायटरी मॅग्नेटीक स्ट्रीपवर अदारीत जूने ATM कार्ड वापरत असतील तर, ते त्वरीत बदला अन्यथा...
बॅंकेने ग्राहकांना माहिती देताना म्हटले आहे की, एक जानेवारीपासून ती सर्व एटीएम कार्ड ब्लॉक केली जाणार आहेत. जी PSB ग्राहकांकडे जूनी पूराणी आहेत.
ही एटीएम कार्ड बदलताना ग्राहकांना बॅंकेत जावे लागेल. त्यानंतर EVM चिप असलेल्या नव्या एटीएमसाठी अर्ज द्यावा लागेल. बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार ही नवी एटीएम कार्ड्स कोणत्याही बॅंकेच्या एटीएम मशीनमध्ये वापरता येतील.
दरम्यान, स्टेट बॅंकेसह इतर अनेक बॅंकांनी यापूर्वीच आपली जूनी एटीएम ब्लॉक केली आहेत.