जगातील सर्वात उंचीवर असलेलं मतदान केंद्र

समुद्रसपाटीपासून 15,256 फूट उंचीवर मतदान केंद्र आहे.

Updated: May 19, 2019, 04:07 PM IST
जगातील सर्वात उंचीवर असलेलं मतदान केंद्र title=

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये जगातील सर्वात उंच मतदान केंद्र ताशिगांग गावात आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आज मतदान पार पडतं आहे. राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, हे मतदान केंद्र 15,256 फूट उंचीवर आहे.

राज्याचे निवडणूक अधिकारी हरबंस लाल धीमान यांनी माहिती दिली की, लाहौल-स्पीती जिल्ह्यातील ताशिगांग मतदान केंद्रावर 49 मतदार आहेत. येथे 7 वाजता मतदान सुरु झालं तेव्हा तापमान 0 अंशांच्या खाली होतं. पण मतदारांनी इतक्या थंडीतही आपल्या पांरपरिक वेशभुषेत मतदान केलं. सकाळी 9 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान झालं आहे.

मतदान केंद्रात 49 पैकी 29 पुरुष आणि 20 महिला मतदार आहेत. याआधी हे मतदान केंद्र कमी उंचीवर होतं. पण पावसामुऴे नुकसान झाल्याने पहिल्यांदा टशीगंगच्या शाळेत मतदान केंद्र ठेवण्यात आलं आहे.