आरएसएस विचारसरणीची माणसं काँग्रेसच्या मानगुटीवर - खुर्शिद

 काँग्रेसमध्येही आरएसएस विचारधारेची माणसं घुसलीत, असं मत व्यक्त केलंय काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी... 

Updated: Jul 11, 2017, 11:30 PM IST
आरएसएस विचारसरणीची माणसं काँग्रेसच्या मानगुटीवर - खुर्शिद title=

नवी दिल्ली :  काँग्रेसमध्येही आरएसएस विचारधारेची माणसं घुसलीत, असं मत व्यक्त केलंय काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी... 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माणसं काँग्रेसमध्ये घुसली असून ती पक्षाच्या मानगुटीवर बसली आहेत... गंमत म्हणजे, त्या लोकांनाही माहीत नाही की ती संघाच्या विचारधारेशी साम्य ठेवतात, अशी टीका सलमान खुर्शीद यांनी केलीय. पहिल्यांदा या गोष्टीची कल्पना बाबरी मशिद पाडली त्यावेळी आला... तेव्हा काही काँग्रेस नेत्यांनीच आपल्या पक्षाला 'धर्मनिरपेक्षतावादी' म्हणण्यावर जाहीर आक्षेप घेतला होता, असंही खुर्शिद यांनी म्हटलंय. 

एकेकाळी काँग्रेसचं मुखपत्र प्रसिद्ध असणारे 'नॅशनल हॅराल्ड' नुकतंच पुनरुज्जीवत करण्यात आलंय. या वृत्तपत्रला दिलेल्या मुलाखतीत खुर्शीद यांनी ही टीका केलीय.

काँग्रेसच्या राज्यात संघाची वाढ का थोपवली नाही? असा प्रश्न मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सलमान खुर्शीद यांनी हे विधान केलंय.