खुशखबर : गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत एकही कोरोना रुग्ण नाही

दिल्लीत ५ रुग्णांनी कोरोना सारख्या धोकादायक विषाणूवर मात मिळवली आहे.  

Updated: Mar 24, 2020, 02:48 PM IST
खुशखबर : गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत एकही कोरोना रुग्ण नाही title=

दिल्ली : गेल्या काही दिलसांपासून फक्त कोरोना रुग्णांच्या संख्यंत वाढ होत असल्याचं चित्र होतं. पण गेल्या २४ तासांपासून दिल्लीत एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. शिवाय दिल्लीत ५ रुग्णांनी कोरोना सारख्या धोकादायक विषाणूवर मात मिळवली आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या योग्य उपचारानंतर सुखरूप बाहेर पडणाऱ्या रुग्णांचा आकडासमोर येत आहे. अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. 

कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप पाहता केंद्र आणि राज्य सरकार अतिमहत्त्वाची पावलं उचलताना दिसत आहेत. काल मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु अत्यावश्यक सेवांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही. 

परिस्थीती पाहता नागरिकांनी देखील स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेणं तितकचं गरजेचं आहे. आतापर्यंत १०१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. ६४ व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. यूएईवरून मुंबईत ही व्यक्ती दाखल झाली होती. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदीचा निर्णय घेतला. पण लोकं या निर्णयाचे तीन तेरा वाजवताना दिसत आहेत. राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही १०१ वर पोहोचली आहे.