Royal Enfield Bullet : बुलेट घेण्याचा विचार करण्याआधी या 4 महत्वाच्या गोष्टी वाचा; अन्यथा होईल पश्चाताप

Royal Enfield Bullet : जर तुम्ही रॉयल एनफील्ड बुलेट घेणार असाल तर आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुमच्यासाठी गरजेच्या आहे.

Updated: Jul 13, 2022, 10:53 AM IST
Royal Enfield Bullet : बुलेट घेण्याचा विचार करण्याआधी या 4 महत्वाच्या गोष्टी वाचा; अन्यथा होईल पश्चाताप title=

मुंबई : Who Should Not Buy Royal Enfield Bullet: रॉयल एनफील्ड बुलेट अनेक दशकांपासून लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे परंतु रॉयल एनफील्ड बुलेट प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य असेलच असे नाही. ती बुलेट असो किंवा कोणतीही बाईक, ती सर्व लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही.

जेव्हा एखादी व्यक्ती नवीन बाईक विकत घेतो तेव्हा आपल्या काही अपेक्षा असतात, जसे की बाईकचा मायलेज जास्त असावा, बाईकच्या सर्विंसची किंमत कमी असेल, बाईकची सीसी जास्त असावा

अशा परिस्थितीत जर तुम्ही रॉयल एनफिल्डची बुलेट खरेदी करणार असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. 

रॉयल एनफिल्ड सर्वच लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे  4 प्रकारच्या लोकांनी ही बाईक घेऊन नये.

ज्या लोकांना मायलेज हवं आहे.
जर तुम्हाला तुमच्या नवीन बाईकने जास्त मायलेज द्यायचे असेल तर बुलेटमुळे ते शक्य नाही. बुलेटचे इंजिन 350 cc चे आहे. म्हणजेच ते मोठे इंजिन आहे आणि मोठे इंजिन असल्यामुळे ते कमी इंधन जास्त वापरते देते. त्यामुळे बाईक चालवण्याचा खर्च जास्त येतो.

ज्या लोकांना कमी वजनाची बाईक हवी आहे
तुम्ही हलकी मोटारसायकल विकत घेण्याचा विचार करत असाल तर, बुलेट तुमच्यासाठी योग्य पर्याय नाही. कारण बुलेटचे वजन जास्त असते. आणि तिची स्वारी तुमच्यासाठी धोकादायकही ठरू शकते.

ज्या लोकांना स्वस्त सर्व्हिस बाइक हवी आहे
रॉयल एनफिल्ड हे बुलेटचे लक्झरी उत्पादन मानले जाऊ शकते कारण लोक त्याला स्टेटस सिम्बॉल म्हणून घेऊ लागले आहेत. बाईकची सर्व्हिसिंगची किंमतही जास्त आहे. जर तुम्हाला अशी बाइक घ्यायची असेल ज्याची सर्व्हिसिंग किंमत कमी असेल, तर तुम्ही बुलेट टाळली पाहिजे.

परवडणारी बाइक अॅक्सेसरीज
रॉयल एनफिल्ड बुलेटची अॅक्सेसरीज आणि स्पेअर पार्ट देखील खूप महाग आहे. जर तुम्हाला अशी बाइक घ्यायची असेल जिचे अॅक्सेसरीज आणि सामान स्वस्त असेल तर ही बाईक तुमच्यासाठी चांगला पर्याय नाही.