1 ऑक्टोबरपासून होणार घरखर्चावर परिणाम करणारे 'हे' पाच मोठे बदल

Rule Change From 1st October : 1 ऑक्टोबरपासून देशात काही मोठे बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिश्यावर होणार आहे. चला बघूया कोणते आहेत हे बदल

Updated: Sep 27, 2024, 02:24 PM IST
1 ऑक्टोबरपासून होणार घरखर्चावर परिणाम करणारे 'हे' पाच मोठे बदल title=

Rule Change: 1 ऑक्टोबरपासून देशात काही मोठे बदल होणार असून त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. यात गॅस सिलेंडरच्या किंमतीपासून क्रेडीट कार्ड आणि पीपीएफ अकाउंट सारख्या 5 मोठ्या बदलांचा समावेश आहे. जाणून घेऊया या बदलांबद्दल सविस्तर...

'हे' आहेत ऑक्टोबरमध्ये होणारे 5 बदल

 

1. एलपीजी सिलिंडरची किंमत (LPG Cylinder Price) 
ऑईल मार्केटींग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करतात. त्याप्रमाणे 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सुधारित किंमती जाहिर केल्या जाऊ शकतात. अलीकडच्या काळात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमतीत बदल झाले असताना, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ची वेबसाईट बघता सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेला दिल्लीपासून मुंबईपर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत वाढली होती. पण यंदा दिवाळीच्या आधी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. 

2. ATF आणि CNG-PNG च्या किंमती
देशभरात महिन्याच्या एक तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल होत असतात. पण यासोबतच ऑईल मार्केटींग कंपन्या हवाई इंधन म्हणजेच एयर टबाईन फ्लूल (ATF) आणि सीएनजी-पीएनजी (CNG-PNG) च्या किंमतीचाही विचार केला जातो. आता 1 ऑक्टोबरलाही यांच्या नवीन किंमती जाहीर होण्याची शक्यता आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात एटीएफच्या किंमतीत घट झाली होती. मुंबईत याची किंमत 91,650.34 प्रति किलोमीटर वरून कमी होऊन 87,432.78 रूपये झाली. 

3. HDFC बॅंकचे क्रेडिट कार्ड
जर तुम्हीही एचडीएफसी बँकचे ग्राहक असाल तर लक्षात घ्या की, काही क्रडिट कार्ड्ससाठी लॉयल्टी प्रोग्राममध्ये बदल करण्यात आला आहे. हे नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. एवढंच नाही तर एचडीएफसी बँकने स्मार्टबाय प्लॅटफॉर्मवर अ‍ॅपलच्या प्रॉडक्टवर खास रिवॉर्ड पॉईंटच्या रिडम्पशनमध्ये वाढ केली असल्याचे सांगितले जात आहे. 

4. सुकन्या समृद्धी योजना
खास मुलींसाठी सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजने संबंधीतही एक मोठा बदल होणार आहे. या अंतर्गत, पहिल्या तारखेपासून केवळ मुलींचे कायदेशीर पालकच त्याचे हे अकाउंट वापरू शकतात. नवीन नियमानुसार, जर एखाद्या मुलीचे SSY खाते कोणी अशा व्यक्तीने उघडले जो तिचा कायदेशीर पालक नाही, तर तिला हे अकाउंट आपल्या कायदेशीर पालकांकडे हस्तांतरित करावे लागेल. कारण तसे न केल्यास ते खाते बंद केले जाऊ शकते.

5. पीपीएफ अकाउंट संबंधीत नियम
पब्लिक प्रोविडेंड फंड (PPF) योजनेतही 1ऑक्टोबरपासून काही बदल होणार आहेत. 21 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाने नवीन नियमांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यात असे सांगण्यात आले होते की पीपीएफची एकापेक्षा जास्त अकाउंट असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. याशिवाय, जोपर्यंत व्यक्ती 18 वर्षांची होत नाही, तोपर्यंत पीपीएफचे व्याजदर त्या व्यक्तीला मिळणार नाही.