मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) दररोज विविध प्रकारचे असंख्य व्हीडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हीडिओ व्हायरल झालाय. रेल्वे कर्मचाऱ्याची हातचलाखी कॅमेऱ्यात कैद झालीय. प्रवासाने तिकिटीसाठी दिलेल्या 500 रुपयांची नोट रेल्वे कर्मचाऱ्याने 20 रुपयांची करुन दाखवली. मात्र प्रवासाच्या सतर्कतेने कर्मचाऱ्याची हातचलाखी समोर आली. प्रवाशाने या फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याची ट्विटद्वारे तक्रार दाखल केली. (ticket clerk cheted to passenger by replacing 500 note with 20 at nizamuddin railway station video viral on social media)
हा व्हायरल होणारा व्हीडिओ निझामुद्दीन रेल्वे स्टेशनवरील आहे. या स्टेशनवरील तिकीट काउंटरवर प्रवाशी कर्मचाऱ्याला 500 रुपयांची नोट देतो आणि 1 सुपरफास्ट ग्वाल्हेरची मागणी करतो. मात्र तितक्यात हा कर्मचारी प्रवाशाला बोलण्यात गुंतवून आपल्या दुसऱ्या हाताने 500 नोट 20 रुपयात बदलतो. मात्र हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असल्याने कर्मचाऱ्याने केलेला सर्व प्रकार सर्वांसमोर आला आहे.
प्रवाशाने या प्रकारानंतर या कर्मचाऱ्याची ट्विट करुन ऑनलाईन तक्रार केली. रेल्वे प्रशासनाकडूनही संबंधित विभागाला आवश्यक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
हा व्हायरल व्हीडिओ पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. शासनाकडून गलेलठ्ठ पगार घेतता तरी काही रुपयांसाठी प्रवाशांची फसवणूक करता. अशा कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करायला हवं, या आणि अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.