रांची : राजकीय कैद्यांना तुरुंगात दिल्या जाणाऱ्या सुविधा लालू प्रसाद यांना मात्र मिळत नाहीत आणि त्यामुळे लालू मात्र चांगलेच वैतागलेत. तशी तक्रारही लालू प्रसाद यांनी सीबीआय विशेष न्यायाधीशांकडे केलीय.
उल्लेखनीय म्हणजे, स्वत:ला अटक करवून घेणाऱ्या लालूंच्या दोन 'सेवादारां'ची बुधवारीच सुटका करण्यात आलीय.
बुधवारी दुमका खजाना प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयासमोर हजर झालेले लालू सुनावणीपूर्वी न्यायाधीश शिवपाल सिंह यांच्यासोबत गप्पा मारताना दिसले. शिवपाल सिंह यांनीच चारा घोटाळ्यातील दोषी म्हणून लालूंना साडे तीन वर्षांची शिक्षा आणि १० लाखांचा दंड ठोठावलाय.
यावेळी, आपल्याला साधारण कैद्यांप्रमाणे तुरुंगात वागणूक मिळत असल्याचं सांगितलं. यावर न्यायाधीशांनी सर्वांसाठी एकच नियम असल्याचं उत्तर दिलं.