आजकाल प्रत्येकाला मेहनत न करता झटपट श्रीमंत व्हायचं आहे. त्यासाठी सोशल मीडियावर रिल्सपासून व्हिडीओच्या माध्यमातून पैसे कमावले जातात. पण या व्हिडीओसाठीही मेहनत करावी लागते. पण अकरावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाने घरात बसून लाखोंची कमाई केली आहे. तो अनेक तास बंद खोलीत बसून पोर्नोग्राफीचा व्यापार करायचा. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात अनेक खुलासे झाले आहे, ज्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे.
या विद्यार्थ्याने देशभरात 4000 चाइल्ड पॉर्नोग्राफी व्हिडीओ विकल्याचे तपासात समोर आलंय. जिल्ह्यातील चौरीचौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुथवैनार भागात राहणारा हा मुलगा इयत्ता 11वीचा विद्यार्थी असून या वयात त्याला सायबरशी संबंधित अनेक तंत्रज्ञानाची माहिती इतकी झाली की, या पठ्ठ्याने ॲप तयार करून त्यावर हे अश्लिल व्हिडीओ अपलोड केले. चाइल्ड पोर्नोग्राफीचे हजारो व्हिडीओ, मागणीनुसार आणि वयानुसार, तो देशभरात विकण्यात तांत्रिक तज्ज्ञ बनला आणि लाखोंची कमाई करु लागला होता.
मुलाने पोलिसांना सांगितलं की, राज नावाचा तरुण त्याचा टेलिग्रामवर मित्र बनला जो त्याला अश्लील व्हिडीओ पाठवत असे. यानंतर त्याने सोशल मीडिया ग्रुपवर 30 टक्के कमिशनवर व्हिडीओ विकले. त्याने पुढे सांगितले की, व्हिडीओला लाईक करण्यासाठी, व्हिडीओचा स्क्रीनशॉट ग्राहकांना पाठवला होता. ज्या व्हिडीओला पसंती मिळाली त्यानुसार किंमत ठरवण्यात आली. याची सुरुवात सुमारे 3000 रुपयांपासून झाली. ज्यासाठी क्यूआर कोड पाठवून पैशांची मागणी करण्यात आली. पैसे मिळाल्यानंतर त्यातील 70 टक्के रक्कम राज आपल्याजवळ ठेवत होता आणि 30 टक्के रक्कम या मुलाच्या खात्यावर पाठवायचा. यामध्ये वयानुसार व्हिडीओची किंमत ठरवण्यात आली होती. विशेष म्हणजे काही व्हिडीओ 20 हजार रुपयांनाही विकले गेले आहेत, याचे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. आरोपी मुलाने सायबर एक्सपर्टला इतरही अनेक माहिती दिल्याचे सांगितलं आहे. त्याआधारे तपास पुढे नेण्यात येत आहे.
आरोपी मुलाने पोलीस चौकशीत आपला गुन्हा कबूल केला असून त्याने सोशल मीडिया आणि नेकोग्राम ॲपवर अकाउंट तयार केल्याचे सांगितलंय. याशिवाय, त्याने टेलिग्रामच्या माध्यमातून डार्क वेब विक्रेता म्हणूनही काम केलं. ज्याच्या मदतीने तो आतापर्यंत व्हिडीओ विकण्यात यशस्वी झाला. सायबर पोलिसांना या साइटवर अनेक अश्लील चॅटिंगही आढळून आल्या आहेत. दरम्यान सायबर पोलीस राज नावाच्या तरुणाचाही शोध घेत आहेत. जो त्याला व्हिडीओ पुरवायचा.
सध्या या मुलाविरुद्ध गोरखपूरच्या सायबर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला बाल न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय. सायबर ट्रॅकिंग एजन्सी तेलंगणाकडून विद्यार्थ्याच्या कृत्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितलं. ही माहिती भारत सरकारच्या महिला व बालविकास विभागाला कोणी दिली आणि तिथून खात्री केल्यानंतर हे प्रकरण लखनौला पोहोचले. इथे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, महिला विकास मंत्रालयाने गोरखपूर पोलिसांना आरोपी किशोरला ताब्यात घेण्यासाठी आणि सायबर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी पत्र पाठवलं होतं. ज्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. या काळात त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये सुमारे 4000 पॉर्न व्हिडीओ सापडले आहेत.