Credit Card Rules: आज पती-पत्नी दोघेही कामावर जातात. स्पर्धेच्या युगात कामाचा ताण वाढला आहे. अशात स्व:ताकडे लक्ष द्यायला पण वेळ असतो. नातेवाईकांचे वाढदिवस, मुलांचे वाढदिवस यासाठी गिफ्ट असो किंवा सणासुद्दीची खरेदी असो, या सगळ्यासाठी आपल्याला बाजारात जायला पण वेळ मिळत नाही. अशावेळी गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. या ऑनलाइन शॉपिंगमध्ये आपण Credit Cardचा वापर करतो. लोक आता मोठ्या संख्येने Credit Cardचा वापर करत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन बँका पण फ्रीमध्ये Credit Card देत आहेत. या Credit Cardचा वापर केल्यानंतर जेव्हा बिल येतं तेव्हा त्यात अनेक चार्जेस लावले असतात. ज्याबद्दल तुम्हाला काही कल्पना तुम्हाला नसतं. त्यामुळे जर तुम्ही Credit Card वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. (trending news if you use credit card then definitely know these rules in maratha)
बँक तुम्हाला दर महिन्याला Credit Cardचे बिल पाठवतं. हे बिल भरण्यासाठी बँक तुम्हाला 10 ते 15 दिवसांचा वेळदेखील देतो. पण वेळेत बिल भरलं नाही तर तुम्हाला लेट फीस द्यावी लागते. जवळपास सर्व बँकांमध्ये 500 रुपये लेट फीस घेतली जाते.
जर तुम्ही Credit Cardवर मिनिमम अमाउंट भरली तर बाकी अमाउंटवर बँक तुमच्याकडून भारी चार्जेस वसूल करते. तुम्ही मिनिमम अमाउंट भरून लेट फीसपासून वाचता पण ड्यू अमाउंटवरुन बँक तुमच्याकडून व्याज वसूल करतं. त्यामुळे कायम पूर्ण बिल भरा.
जर तुम्ही Credit Card लिमिटपेक्षा जास्त खर्च केल्यास म्हणजे 1 लाख किंवा 2 लाखांपर्यंत खर्च केल्यास बँक तुमच्याकडून चार्जेस वसूल करते. हे चार्जेस प्रत्येक बँकांचे वेगवेगळे आहेत. अशावेळी तुम्ही कार्डवरील लिमिट बाकी आहे की नाही? याशिवाय तुम्ही बँकेच्या अर्जामध्ये लिमिट सेट करु शकता.
आजकाल अनेक बँका Credit Cardवरील EMIद्वारे खरेदी करण्याचा सल्ला देतात. मात्र Credit Cardवरील EMIमुळे तुमचे दुहेरी नुकसान होतं. तुमच्याकडून व्याजसोबत प्रोसेसिंग फीस घेतली जाते. दुसरं म्हणजे तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळत नाहीत.