Bank Job: बँकांमध्ये अधिकारी व्हायचंय? ही बातमी फक्त तुमच्यासाठी

अर्ज आणि फी जमा करण्याची आज 22 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. म्हणून त्वरित अधिकृत साइटवर जा आणि ही संधी गमावू नका. नाही तर तुम्हाला कायमचा पश्चाताप होईल. 

Updated: Aug 22, 2022, 10:40 AM IST
Bank Job: बँकांमध्ये अधिकारी व्हायचंय? ही बातमी फक्त तुमच्यासाठी title=
trending news last chance of became bank officer today see ibps po recruitment notification bank job 2022 in marathi

IBPS PO Recruitment 2022 -तुमची बँकेत ऑफिस होण्याची स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तुम्हाला चांगला पगार, भरपूर सुट्ट्या, आणि सरकारी निवासस्थान हे सगळं मिळू शकतं. त्यासाठी तुम्ही ही संधी गमावू नका. Institute of Banking Personnel Selection (IBPS) आणि  6 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO)साठी सुमारे  7000 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. ही सुवर्णसंधीसाठी आज शेवटची तारीख आहे. 

विशेष म्हणजे पदवीधर उमेदवार या सरकारी नोकरीसाठी अर्ज करु शकता. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी आज अंतिम तारीख आहे. इच्छुक उमेदवाऱ्यांनी ibps.in वर IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि अर्ज करा. (trending news last chance of became bank officer today see ibps po recruitment notification bank job 2022 in marathi)

या बँकेत आहे संधी

IBPSने 1 ऑगस्टला बँक PO साठी 6932 पदांसाठी भरती जाहीर केली होती. त्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील 6 बँका, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाने 6,432 प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी पदे यासाठी अधिसूचना जारी केली होती. 

ज्यांना कॅनरा बँकेत नोकरी हवी असेल त्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण या भरती प्रक्रियेत सर्वाधिक रिक्त जागा कॅनरा बँकेत आहेत. कॅनरा बँकेत एकूण 6932 पैकी 2799 पदे रिक्त आहेत. SC प्रवर्गातील 1071 पदे, ST प्रवर्गातील 520 पदे, OBCसाठी 1876 आणि EWSसाठी 666 पदे भरण्यात येणार आहेत.

ही संधी गमावू नका

या नोकऱ्यांसाठी पात्र उमेदवारांची निवड प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क रु 850/- ठेवण्यात आले आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 175/- शुल्क आहे. त्यामुळे अर्ज आणि फी जमा करण्याची आज 22 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. म्हणून त्वरित अधिकृत साइटवर जा आणि ही संधी गमावू नका. नाही तर तुम्हाला कायमचा पश्चाताप होईल.