बेडवर झोपून मोबाईलवर खेळता-खेळता रसगुल्ला तोंडात टाकला, तरुणाचा जागीच मृत्यू झाला...

Trending News : बेडवर झोपून मोबाईलवर खेळता-खेळता रसगुल्ला खाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. रसगुल्ला गळ्यात अडकल्याने तरुणाचा श्वास अडकला आणि बेडवरच तरुणाचा मृत्यू झाला. 

राजीव कासले | Updated: Aug 19, 2024, 05:17 PM IST
बेडवर झोपून मोबाईलवर खेळता-खेळता रसगुल्ला तोंडात टाकला, तरुणाचा जागीच मृत्यू झाला... title=

Trending News : बेडवर झोपून खाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. एक तरुणाने बेडवर झोपून मोबाईलवर खेळता-खेळता रसगुल्ला (Rasgulla) तोंडात टाकला. पण  रसगुल्ला गळ्यात अडकल्याने तरुणाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. वेळीच उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. तरुण मुलाच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. झारखंडच्या (Jharkhand) पाटमहुलिया गावातील ही धक्कादायक घटना आहे. या गावात राहाणाऱ्या अमित सिंह या तरुणाचे काका ओडीसात नोकरी करतात तब्बल तीन महिन्यांनी काका घरी येणार असल्याने आनंदाचं वातवरण होतं. त्यांच्या स्वागतासाठी रसगुल्ला आणला होता. पण हा रसगुल्ला तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरला.

काय आहे नेमकी घटना?
झारखंडच्या पूर्व सिंहभूमी भागात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. तरुण मुलाच्या मृत्यूने आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. 16 वर्षांचा अमित सिंहचे काका रोनी सिंह ओडिसातल्या अंगुल इथं नोकरी करतात. तीन महिन्यांनंतर ते आपल्या घरी परतणार होता. त्यांच्या येण्याने कुटुंबात आनंदाचं वातवरण होतं. काकांना आणण्यासाठी अमित स्वत: बाईक घेऊन गालुडिह रेल्वे स्टेशनवर गेला. परत येतांना काही तरी गोड घ्यावं म्हणून रसगुल्लाचं पाकिट विकत घेतलं. 

घरी पोहोचल्यानंतर काका रोनी सिंह यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. कुटुंबातील सर्वांना रसगुल्ला वाटण्यात आला. यादरम्यान अमित बेडवर झोपला आणि मोबाईलवर खेळू लागला. त्याच्या बहिणीने त्याला खाण्यासाठी रसगुल्ला दिला. बेडवर झोपलेल्या अवस्थतेच अमित सिंगने तोंडात रसगुल्ला टाकला. पण रसगुल्ला त्याच्या गळ्यात अडकला. काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू  लागलं आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य बाहेरच्या खोलीत होते, अमितचा आवाज ऐकताच सर्व सदस्य अमितच्या खोलीत गेले. 

अमितची अवस्था पाहून सर्व जण घाबवले आणि त्याला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले. पण त्यापूर्वीच अमितचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. श्वास अडकल्याने अमितचा मृत्यू झाला होता. 

अमितच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार रसगुल्ला खाताना अमित बेडवर झोपला होता. त्याच्या हातात मोबाईल होता आणि त्यावर तो गेम खेळत होता. रसगुल्ला चावून खाण्याऐवजी त्याने तो अख्खा रसगुल्ला गिळला. यावेळी त्याच्या बेडजवळ कुटुंबातील कोणताही सदस्य नव्हता. कदाचित वेळीच उपचार मिळाले असते तर अमित जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिलीय. अमित हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. नवव्या इयत्तेत तो शिकत होता.

याप्रकरणी पोलिसांनी नेमकं काय घडलं याचा तपास सुरु केला आहे. याप्रकरणी अमितच्या कुटुंबियांचीही चौकशी केली जात असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.